संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सयुक्त संघर्ष समितीचे पदाधिकारी यांचे सोबत चर्चेत डॉ. अभिजीत चौधरी आयुक्त,मनपा यांची माहिती
कामठी :- सयुक्त संघर्ष समितीचे पदाधिकारी याची हुडकेश्वर नरसाळा परिसरातील विवीध समस्या व विकास कामासंबधी शुक्रवार दि. 19/7/2024 ला मा. आयुक्त मनपा नागपूर यांचे दालनात चर्चा संपन्न झाली. यावेळी सिवरेज लाईनचे संदर्भात मा. आयुक्त यांनी माहिती दिली की, याकरीत निधी उपलब्ध झालेला असुन कामाच्या निविदाही निघालेल्या असुन लवकरच प्रत्यक्ष सिवरेज लाईनचे काम सुरू करण्यात येईल. न्युओमनगर येथील बगीच्याचे रखडलेल्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करून कामाची पूर्तता करण्याचे संबंधीत अधिकारी यांना निर्देश दिले. परीसरातील भूखडांचे नियमितीकरन करण्याचे संदर्भात आखिवप्रतीका नागरीकांना देण्यासंबंधी कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले. त्याचप्रमाणे नळाचे बिल ऑनलाईन पद्धतीने स्विकारणे , इंगोले नगर चौक पुण्यधाम मार्ग वळणावर असामाजिक तत्वाचा वावर असलेल्या जागी सि .सि.टि .व्ही . बसवीने , पाणी साचत असलेल्या रिकाम्या भूखंडावर कारवाई करणे , पोहरा नदीचे दोन्ही बाजुस सुरक्षा भिंत उभारणे , हुडकेश्वर सिमेंट रस्त्याचे अर्धवट राहीलेले कामे पूर्ण करणे , इंगोले नगर मैदानात ग्रिन जिम लावणे , मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी संयुक्त संघर्ष समिती चे अध्यक्ष धनराज वलुकार , सचिव सतिष कसरे , सुनिता दामले , चंदू खांबलकर , हेमराज पाटील , मंगेश चरडे, दत्तराज हनवते , महादेव मोहितकर , वंदना पाटील , सुनिता नंदनकर , अनिता मेश्राम , प्रणय पेठे , गोतमारे यादी पदाधीकरी यांची उपस्थिती होती .