संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- येत्या 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत च्या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी 90 उमेदवार तसेच 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ही निवडणूक 122 मतदान केंद्रावर होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर निवडणूक पूर्व मतदानाची तयारी म्हणून आज गुरुवार 15 डिसेंबर ला 122 ईव्हीएम मशीन व राखीव 12 असे एकूण 134 मशीनची कामठी तहसील कार्यालयात तपासणी करून सिलिंग करण्यात येणार आहे .निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या देखरेखेखाली मशीन सिलिंगची प्रक्रिया करण्यात येणार आहे.तेव्हा उमेदवारांनी विशेषत्वाने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
18 डिसेंबर ला होणाऱ्या ग्रा प निवडणुकीसाठी निवडणूक विभागासह प्रशासन सज्ज होऊन निवडणूक कामाला लागले आहेत .तर मतदानाची पूर्व तयारी म्हणून ईव्हीएम मशीन सिलिंग करण्यात येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या देखरेखेखाली निवडणूक क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक सह तालुक्यातील तलाठी हे मशिन सिलिंग चे कामे पाहतील यासाठी उमेदवारानी उपस्थिती दर्शवावी .मतदानाची प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडावी यासाठी निवडणूक विभाग विशेष लक्ष ठेवून आहे.
मतदानाची पूर्व तयारी म्हणून 15 डिसेंबर ला सकाळी 9 वाजेपासून कामठी तहसील कार्यालयात इव्हिएम मशीन सिलिंग करण्यात येणार आहे तर या प्रक्रियेसाठी व सिलिंग प्रसंगी उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत निवडणूक विभागातर्फे पत्र सुद्धा देण्यात आले आहे त्यानुसार उमेदवारांच्या समक्ष मशीन सिलिंग करण्यात येत असल्याने काही उमेदवारांनी प्रामुख्याने विशेष हजेरी लावावी असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.