उष्मघाताने मृत्यू पावलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 :- कन्हान रेल्वे स्टेशन प्लेट फार्म नं.१ वर एक अनोळखी व्यक्ती भोवळ पडलेल्या परिस्थितीत आढळल्याने त्यास उपचारार्थ कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याचा मुत्यु झाल्याने त्याचा उष्मघाताने मुत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असता मृतदेहावर पुढील उत्तरीय तपासणी करण्यासाठी कामठीच्या शासकोय उप जिल्हा ग्रामिण रूग्णालयात हलविण्यात आले .ही घटना 24 मे ला घडली असून या अनोळखी मृतकाची ओळख पटली असून मृतकाचे नाव प्रीतमलाल हरर्कंडे वय 45 वर्षे रा मरारटोला ,तह आमगाव जील्हा गोंदिया असे आहे.
मृतकाच्या नातेवाईक आज कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पोहोचताच मृतकाची ओळख पटवून घेतल्या नंतर मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.मृतकाच्या पाठिमागे कुटुंबात पत्नी 2 मुलं, 1 मुलगी असा आप्तपरिवार असून सदर मृतक हा व्यवसायाने धोबी असून आपल्या कुटुंबात हा कमी वास्तव्यास राहत असून बरेच दिवस हा घरी परतला नव्हता तर मात्र थेट याचा मृतदेहच कुटुंबाच्या स्वाधीन आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नाव नोंदणीसाठी एक दिवसाची प्रतिक्षा ; समर्पित आयोग शनिवारी

Thu May 26 , 2022
इतर मागास प्रवर्गाची मते जाणून घेणार नागपूर, दि. 26 : समर्पित आयोगाच्या भेटीच्यावेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी शुक्रवार, दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करायची असून एकच दिवस नोंदणीसाठी राहिला आहे. नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले ओ. जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com