संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कन्हान रेल्वे मार्गावरील अपलाईन रेल्वे रुळाच्या बाजूला पोल क्र 1113/19-21 च्या मधात साई मंदिर जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह 9 जानेवारी ला सकाळी आढळला असून सदर अनोळखी मृतदेहाची ओळख नुकतीच पटली असून मृतकाचे नाव सचिन वैद्य वय 35 वर्षे रा संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक सचिन वैद्या हा पत्नीच्या विरहात मनोरुग्ण स्थितीत असल्याने उपचारार्थ 22 नोव्हेंबर 2023 ला नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान 7 डिसेंबर 2023 ला कुणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याने यासंदर्भात मिसिंग ची तक्रार नोंद करीत तपासाला गती देऊनही कुठेही थांगपत्ता लागत नव्हता अखेर 9 जानेवारीला रेल्वे अपघातात चक्क मृतदेहच आढळला.
उल्लेखणीय आहे की सदर मृतकाच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते.दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिसिंग संदर्भात विशेष निर्माण केलेल्या व्हाट्सएप ग्रुप मधून सदर मिसिंग संदर्भात आलेल्या माहितीवर पोलीस कर्मचारी संजय पिल्ले यांनी भर देत नमूद असलेल्या मोबाईल क्रमांक वर फोन करून हिंगणघाटहुन नातेवाईकाना बोलावून सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली असता सदर मृतदेहाची ओळख पटली…