संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दहा वर्षात रामटेक लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात जनतेची भाजप सरकारकडून झालेली उपेक्षा त्या शासनाकडून आश्वासन देऊन प्रलंबित ठेवलेली विकास कामे लक्षात घेत केंद्र शासनाच्या विविध विकास कामे योजना आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रात प्रामुख्याने राबविण्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे नेते सुरेश भोयर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्यातर्फे बहादूरा येथील वृंदावन लॉन येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार यांनी मतदारांचे आभार व्यक्त करीत काँग्रेस पक्षात एक सर्व साधारण व्यक्ती सुद्धा खासदार किंवा इतर पदावर निवडून येऊ शकतो हा जनतेचा विश्वास कायम ठेवून भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कार्य अनुरूप संधी मिळेल व ज्याप्रमाणे लोकसभेतील सहा ही मतदार संघात जी आघाडी आपण दिली ते कायम ठेवून भविष्यातील येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकून हुकुमशाही दडपण शाही लोकांना धडा शिकवण्याचे काम आपणास करावयाचे आहे मनोबल न गमावता कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना व एकजूटता कायम ठेवावे रामटेक लोकसभा निवडणुकीत एकूण सहा ही विधानसभेत एक हाती आघाडी ही विरोधकांना सहन होणारी नाही त्यांचे येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस व आघाडीच्या इतर पक्षात गटबाजी व फुटाफुटी चे राजकारण करून आपल्या कार्यकर्त्यांना भ्रमित करण्याचे प्रयत्न भाजप पक्षाचे नेते करतील पण आत्मविश्वास ठाम ठेवून पक्षासाठी कार्यरत रहा. भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीत विजय आपला निश्चितच आहे असे मौलिक प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजक कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करीत राज्याची माजी मंत्री व आपले नेते सुनील केदार यांच्या पक्ष संघटनेच्या कार्य कौशल्यावर विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे तिकीट कुणालाही मिळेल याची पर्वा न करता प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेने काँग्रेसच्या नावाने निवडून दिलेले लोक प्रतिनिधी यांनी पक्ष बळकटीसाठी एकजुटीची मूठ बांधून जनतेला दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना पराभूत करण्याची संधी या लोकसभेच्या निवडणुकीतून प्रेरणादायी ठरलेली आहे पराभवाने हतबल झालेले विरोधक कुठल्याही प्रकारची षडयंत्र करून काँग्रेस पक्ष तोडीचे प्रयत्न करेल त्याला बळी पडू नका असे मत व्यक्त केले या सत्कार समारंभ कार्यक्रमाला जी प अध्यक्ष मुक्ता कोकुर्डे, माजी जि प अध्यक्ष रश्मी बर्वे, जी प उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बालकल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाळे आदी लोकप्रतिनिधी नी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक हुकुमचंद आमधरे, जि प सदस्य दिनेश ढोले , नगरपरिषद कामठीचे माजी अध्यक्ष मो शाहजहा शफाअत, कामठी प स सभापती दिशा चनकापुरे,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, माजी जि प सभापती पुरुषोत्तम शहाणे, सुधाकर तकित, रोशन खडसे, निलेश चामट, सुनील कांबळे, मौदा काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठवकर, कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे, धीरज यादव,माजी नगरसेविका ममता कांबळे, राजेश कांबळे,प्रमोद खोब्रागडे,कृष्णा यादव, पंचायत समिती मौदाचे सभापती स्वप्नील श्रावणकर, अनुराग भोयर, राजेंद्र लांडे, राजीव रहांगडाले, बेनीराम राऊत, शंकर गावंडे, अनिल बुराडे, दीपक गेडाम, नीरज लोणारे, सचिन उईके, बालू लांडगे, किशोर पन्नासे, किशोर धांडे, प्रवीण कुथे, सरपंच सरिता रंगारी , सहा नागपूर ग्रामीणचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अजय राऊत व नागपूर जिल्हा सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष तुळशीराम काळमेघ यांनी केले.