विनारॉयल्टी रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : ‘ एल.सी.बी’ची पालोरा शिवारात यशस्वी कारवाई

पारशिवनी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी ) पथकाने पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पालोरा शिवारात रविवारी ( दि . २० ) दुपारी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनारॉयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला . यात ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला , पोलिस सुत्राव्दारे अशी माहिती मिळाली की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी दुपारी पारशिवनी परिसरात गस्तीवर असताना. त्यातच त्यांना गुप्त माहीती मिळाली की पालोरा ( ता . पारशिवनी ) परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी त्या भागाची पाहणी केली. यात त्यांनी पालोरा गावाजवळ ट्रॅक्टर ( क्र . एमएच ४० बीजी २१६३ ) अडवून तपासणी केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत रेती आढळून आली. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती विनारॉयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतला . या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर ( ट्रॉलीसह ) व पाच हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संपूर्ण मुद्देमाल पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन केला, जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक अप्पर पोलिस अधिक्षक याचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नीरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे आदेशानुसार या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार , हवालदार गजेंद्र चौधरी , रोहन डाखोरे , विपीन गायधने , अमोल, कागदपत्रांची तपासणी कुथे यांच्या पथकाने केली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठ विविध प्राधिकारिणी निवडणूकीची मतमोजणी 22 नोव्हेंबरला

Mon Nov 21 , 2022
सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरु होणार अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी पाचही जिल्ह्रांतील 63 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सर्व मतदान केंद्रावरील सिलबंद मतपेटया विद्यापीठामध्ये पोहोचल्या आहेत. दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजतापासून मतपेटया उघडल्या जाणार असून त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. मतपेटया उघडणे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com