संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुने प्रभाग क्र 14 अंतर्गत येणाऱ्या बुद्धनगर परिसरातील जितेंद्र रामटेके ते नितेश गजभिये यांच्या घराजवळील नाला कोसळल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून या नाल्याच्या काठाला लागून असलेल्या नागरिकांनी संभाव्य धोका लक्षात घेता आधीच सुरक्षात्मक उपाययोजना केल्याने नाला कोसळला मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यांच्या कार्यकाळात सन 2002 मध्ये यादवनगर ते बुद्धनगर पर्यंत सिमेंट दगडी चा नाला बांधकाम पूर्णत्वास आले होते .दरवर्षी या नाल्यातून वाहणारे पावसाचे पाण्यासह , वाहणारे सांडपाणी त्यातही नाला खोलीकरणाकडे दुर्लक्ष असल्याने या नाल्याची दुर्दशा झाली असून नाला हा जीर्णावस्थेत आला असून नाल्याची सुरक्षाभिंत ही कित्येक ठिकानाहून कोसळण्याच्या स्थितीत आहे.यासंदर्भात नाल्याकठी राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकासह नगर परिषद प्रशासनाला माहिती पुरविली व पूर्वसूचना देऊन धोका होण्याचा इशारा दिला मात्र नगर परिषद प्रशासनाने याकडे अक्षम्य दूर्लक्ष पुरवून नाला बांधकाम होणार असल्याचे आश्वासित केले.मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सदर धोकादायक नाला कोसळला मात्र नगर परिषद प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली मात्र नाल्याची डागडुजी करण्यात आली नाही तेव्हा या पावसात नाल्या काठावरील नागरिकांचे कुठलेही हानी न व्हावी यासाठी नगर परिषद प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे.