महावितरणच्या समयसूचकतेने संभाव्य भीषण हानी टळली

नागपूर :- शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीत तत्परतेचा परिचय देत महावितरण कर्मचार्यांनी युद्धस्तरावर काम करीत सावधानतेचा उपाय म्हणून सखल आणि पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा बंद करून संभाव्य भीषण जीवित व वित्त हानी टाळली आहे.

नागपूर शहरात ४ तासात १०० मि. मि. पेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने अंबाझरी आणि गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाला, यामुळे नागनदी आणि पिवळी नदीला पूर आला, सखल भागात पाणी शिरले, लोकांच्या घरात ४ फुटापर्यंत पाणी होते. यामुळे अनेक इमारतीमधील वीज मीटर पाण्यात भिजल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. शंकरनगर येथील महावितरणच्या उपकेंद्रात पाणी साचल्याने तेथून वीजपुरवठा करणाऱ्या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आला. याशिवाय ११ केव्हिच्या १७ वाहिन्या आणि २५० वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता यामुळे सुमारे २५ हजार वीज ग्राहकांचा पुरवठा ३ ते ६ तासापर्यंत बंद होता. महावितरणच्या तत्परता आणि समयसूचकतेमुळे पाण्यात वीज प्रवाह उतरून होणारी संभाव्य हानी टळली. पावसाचे पाणी उतरल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत सुरू करण्यात आला.

धरमपेठ, दांडिगे लेआऊट, रामनगर, शिवाजीनगर, त्रिकोणी पार्क, काचीपुरा, हील टॉप, शंकरनगर, गोकुळपेठ, बजाजनगर, विद्यापीठ परिसर, कळमना, बिनाकी, तांडापेठ, वांजरा, सुभाननगर, राऊत चौक, नाईक तलाव, सेमिनरी हिल्स, महेश नगर, अहबाब कॉलनी, काटोल रोड, कोलाबास्वामी नगर, गंगानगर, मानकापूर, ग्रेटनाग रोड, बाबुळखेडा, सुभाष रोड, मेडिकल चौक, संत्रा मार्केट, बगडगंज, हीवरीनगर, राजाबक्षा, अयोध्यानगर, महाजनावाडी, दाभा, वानाडाँगरी, त्रिमूर्तीनगर या आणि सभोवतालच्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमांडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील वीजपुरवठा ची माहिती घेतली. कार्यकारी अभियंते राजेश घाटोळे, हेमराज ढोके, समीर टेकाडे, राहुल जिवतोडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेत सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत केला.

अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये अद्याप पाणी असल्याने पाणी निघून परिसर कोरडा झाला की तेथील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्र्यांकडून पहाणी

Sun Sep 24 , 2023
– दहा हजार घरांचे नुकसान – घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले – नागरिकांना आवश्यक मदत – घरातील चिखल काढण्यासाठी प्राधान्य – संपूर्ण सफाईला सुरुवात नागपूर :- नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे , घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानी संदर्भात पंचनाम्याला दुपारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com