संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेरूमल चौकातून जुनी कामठी पोलीस गस्त घालत असता एक इसम पोलिसांना पाहून पळू लागला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पळण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तर न देता उडवा उडवीचे उत्तर दिले.पोलिसांनी खाकी वर्दीचा बाणा दाखवताच नरखेड येथील इलाहाबाद बँकेतून हात चालाखिने 19 जुलै रोजी रात्री 8 दरम्यान 20 हजार रुपये चोरी केल्याची कबुली दिली असून नरखेड पोलीस स्टेशन ला त्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे त्यानुसार सदर आरोपीस अटक करीत त्यास नरखेड पोलीस स्टेशन च्या स्वाधीन करण्यात आले.अटक आरोपीचे नाव मो रफिक मो युनूस शेख वय 56 वर्षे रा लकडीपूल नागपूर असे आहे.
ही यशस्वी कारवाई डीसीपी निकेतन कदम,एसीपी विशाल क्षीरसागर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी,शेशकुमार पांडे,मधुकर निखाडे,श्रीकांत भिष्णुरकर, अंकुश गजभिये, स्नेहदीप पानतावणे यांनी केली.