– लोहमार्ग पोलिसाची सहृदयता
– नागपूर रेल्वे स्थानकावरील घटना
नागपूर :- स्वताच्या इच्छेला बाजुला सारून मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घाम गाळणार्या बापाची शेवटची वेळ असते तेव्हा दुरवर असलेल्या संवेदनशील मुलाच्या जीवाची कालवाकालव होते. हृद्य दाटून येते आणि डोळ्यात आसवांची गर्दी होते. अशा स्थितीत पैशाची जुळवा जुळव करून तो गावी निघतो. पण नियतिच साथ देत नाही. भक्कम मेहनतीने कमविलेली संपूर्ण रक्कम चोर घेवून पसार होतो.
अशीच एक संवेदनशील घटना नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. मात्र, लोहमार्ग पोलिसातील संदेशनील हृदयाचे हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांनी अडचनीत सापडलेल्या कुटुंबाला एक हजार रुपयाची आर्थिक मदत केली. भोजन आणि धीर देत रेल्वे तिकीटाची व्यवस्था करून त्यांना गावी पाठविले. माणूसकीवर प्रश्न आणि मानवता जिवंत असे दोन्ही प्रकार पहावयास मिळाले. सरीता आणि अजय इक्का असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. ते भुलमा, झारखंडला राहतात.
गावात काम नसल्याने पती पत्नी भुसावळला कामासाठी गेले. मागील वर्षभर्यापासून ते मजुरीचे काम करतात. अलिकडेच अजयचे वडिल आजारी पडले. त्यांना उपचारासाठी पैशाची गरज होती. पैशाअभावी त्यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मुलगा अजयला दिली. अजयने कष्ठ सोसात कमाविलेली रक्कम आणि उधार असे 25 हजार रुपये गोळा करून 12135 पुणे-नागपूर एक्सप्रेसने निघाले. मागील जनरल डब्यातून प्रवास करीत असताना नागपुरात येण्यापूर्वीच चोराने त्यांच्या पत्नीजवळील पर्समधून 25 हजार रुपये चोरून नेली
हेड कॉन्स्टेबल थॉमसची मानवता
पैसे चोरी झाल्याचे समजताच सरीताचे मोठ मोठ्याने ओरडून रडू लागली तर अजयचेही डोळे पानावले. अंगावरील कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते. हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांना सारा प्रकार सांगितला. थॉमस यांनी त्यांना जेवन दिले. धीर दिला. एक हजार रुपये दिले आणि रेल्वे तिकीटची व्यवस्था करून रेल्वेने पाठविले. तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला पाण्याच्या पहिल्या घोटाची चव अमृततुल्य भासते. तसेच दुःखाने भाजलेल्या व्यक्तीला सुखाच्या शीतलतेची जानीव होते. तशीच स्थिती इक्का दाम्पत्यांची होती. पानावलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या हृदयाने पती पत्नीने थॉमस यांचे आभार मानले.