नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या स्व.बाबुरावजी बोबडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धनाच्या अभियानामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी देखील सहभाग नोंदविला होता.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनांतर्गत शाळेमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, झाडे वाचवा आदी विषयांवर भाषणे दिली. याशिवाय यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रोपट्यांची लागवड केली.
विद्यार्थ्यांनी शाळेजवळील परिसरामध्ये स्वच्छता रॅली देखील काढली. स्वच्छता रॅलीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने स्वत: तयार केलेली फलक हातात पकडली होती. रॅलीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहकार्य केले.
स्व.बाबुरावजी बोबडे मनपा इंग्रजी शाळेमधील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com