सभापती उपसभापती यांनी आंगंनवाडी व शाळेला अचानक दिली भेट

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – तिरोडा पंचायत समिती चे उपसभापती हुपराज जमयवार यांनी अचानक दौऱ्यावर अधिकारी ला घेऊन सोबत सभापती कुंता पटले व पंचायत समिती सदस्य दिपाली टेभेंकर हे देखील सोबत होते. मुरमाडी ग्रामपंचायत ला भेट देऊन आंगंनवाडी ची तपासणी केली व उपकेंद्र आयुष्य वर्धिनीकेंद्र, आयुवेदीक दवाखाना बंद होते. शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक जे बी बेंलपांडे हजेरी पटावर स्वाक्षरी मारून करडी आपल्या राहत्या घरी होते.शाळेत साहाय्यक शिक्षक डि बी शेन्डे उपस्थित होते. शेन्डे याना विचारले असता मुख्याध्यापक तुमसर ला एल आय शी चेक जमा करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले. हलचल रजिस्टर व शिक्षक हजेरी टेबलावर बघीतले असता कोणत्याही प्रकारची नोंदणी केली नसल्याचे आढळून आले. केंद्र प्रमुख धनपाल पटले यांच्या शी दुरध्वनी संपर्क साधून बेंलपांडे याचा सुट्टी चा अर्ज,किंवा सांगितले आहे का माहिती दिली आहे का विचारले असता कसली ही माहिती दिली नसल्याचे सांगितले .सदर शिक्षकाशी केंद्र प्रमुख ने संपर्क साधले असता अर्धा तासात पाऊस येत अंसताना शाळेत पोहोचले. बेलपाडे मिच सांगुन मझ्याकडे परीसरातील शिक्षक चेक जमा करतात व मी तुमसर ला नेहमीच जाऊन देत असल्याचे सांगितले. शाळेची परीस्थिती बिकट व शौचालय ला कुलुप लावले असल्याचे आढळले.पिण्याचे पाणी पण बरोबर नसल्याने आढळून आले. भेट पुस्तक हि नसल्याचे शेन्डे यांनी सांगितले. अधिकारी व सभापती ना आंगंनवाडी येथून दोन कोरे कागद बोलावून भेट दिल्याचे नमुद करण्यात आले व गटशिक्षणाधिकारी मधुकर पारधी याना शाळेची व मुख्खाधापक यांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास कंळविण्यात आले. मुरमाडी, कोयलारी,नांदलपार,लोणारा येथील शाळा, आंगंनवाडी ला भेटी देऊन परिस्थिती ची पाहनी करण्यात आली. मुख्याध्यापक व आंगंनवाडी सेविका यांना मुलांच्या शिक्षण व आरोग्य कडे विशेष लक्ष देण्याचे पदाधिकारी व अधिकारी यांनी सांगितले. विस्तार अधिकारी शितेश पटले,बालप्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, आंगंनवाडी पर्यवेक्षक सौ दाते होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजयुमो उद्योग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत..!

Tue Jul 12 , 2022
नागपूर – भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन एका नवीन आध्ययाची सुरूवात झाली. भाजयुमोतर्फे माजी खासदार व प्रसिद्ध उद्योगपती अजयजी संचेती यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनाच्या दिवशी, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतुन व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या पुढाकाराने भाजयुमो उद्योग विकास मंचाची स्थापना करण्यात आली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com