अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत 20 जुलै 2019 रोजी फिर्यादी नामे जयवंता मनोहर तुमसरे वय 35 वर्ष रा. बेलाटी खुर्द हिने पोलीस स्टेशन तिरोडा येथे येऊन तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये तिने नमुद केले होते.की तिची मुलगी सीमा हिचा विवाह आरोपी राजकुमार उर्फ रुपेश हंसराज भुरे वय 36 वर्ष रा. ढिवर टोली, सिंदपुरी, सिहोरा ह्याच्या सोबत झाला होता. घटनेच्या 15 दिवसा पासून सीमा आणि तिचा पती आरोपी राजकुमार फिर्यादी च्या घरी येऊन दोघेही राहत होते. आरोपी हा दारू पिऊन सीमा हिला मारपीट करीत होता. त्याला फिर्यादी आणि तिचा पती मयत मनोहर यादव तुमसरे वय 60 वर्ष रा. बेलाटी खुर्द हे समजावीत होते. परंतु आरोपी त्यांची ऐकत नव्हता. शेवटी 20 जुलै 2019च्या रात्रीला सर्व झोपले असतांना आरोपी राजकुमार भुरे यांनी त्याचा सासरा मनोहर यादव तुमसरे वय 60 वर्ष रा. बेलाटी खुर्द याचे पोटावर चाकूने वार करून जीवानिशी ठार केलेले आहे. तक्रारी वरून पो स्टे तिरोडा येथे 302, 307 भा द वि अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास तत्कालीन एपीआय सचिन ढोके, पो स्टे तिरोडा यांनी करून पत्र कोर्टात दाखल केलेले आहे.
सदर प्रकरण सत्र न्यायाधीश गोंदिया यांचे कोर्टात सेशन ट्रायल क्रमांक 186/19 प्रमाणे चाललेला आहे. सदर प्रकरणात विद्यमान न्यायालय यांनी दिनांक 11 जुलै 22 रोजी निकाल दिलेला आहे. त्यामध्ये आरोपीला आजन्म कारावास आणि 3000/- रुपये दंड , दंड ना भरल्यास 3 महीने अतिरिक्त शिक्षा ठोठावली आहे. न्यायलयात सरकार तर्फे ॲड. चांदवाणी, जिल्हा सरकारी वकील गोंदिया यांनी सदर प्रकरण चालविलेले असून त्यांना मदत योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, पो स्टे तिरोडा आणि कोर्ट पैरवी पो हवा सहारे यांनी केलेली आहे.