नागपूर :-पेशवाई संपविण्यासाठी 200 वर्षापूर्वी लढणाऱ्या शूरवीर महार बटालियनच्या सैनिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियान अंतर्गत दीक्षाभूमी येथून रन टू मशाल चे आयोजन करण्यात आले होते.
सदर आयोजन शांतीनगर येथील पंचकमिटी बौद्ध विहार, धम्मसेना च्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मयूर मेश्राम असून रन टू मशाल ला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व त्यांच्या भिक्खू संघांनी बुद्ध वंदना घेतली.
यावेळी बसपाचे प्रदेश सचिव व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री यशवंत निकोसे यांच्या व अनेक गणमान्य व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत निळा व पंचशील झेंडा दाखवून सुरुवात केली.
मशाल घेऊन धावणारे युवा आकाश सपकाळ, धीरज इंगळे, अनुराग भातुरकर, हर्ष गोरवे, आकाश ठाकरे, संविधान हिरवे हे उत्कृष्ट धावपटू असून ते वाडी, अमरावती मार्गे मुर्तीजापुर, अकोला, खामगाव, बुलढाणा, चिखली, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, शिरूर मार्गे धावत, धावत भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीच्या मुख्य समारोहात सहभागी होतील.
यावेळी बसपाचे योगेश लांजेवार, उमेश मेश्राम, प्रवीण पाटील, अंकित फुल, विकास नारायने, बुद्धम् राऊत, तपेश पाटील, सचिन माणवटकर, सुबोध साखरे, अविनाश नारनवरे आदी बसपा पदाधिकारी, बहुजन समाजातील कार्यकर्ते व क्रीडाप्रेमीं नियोजित स्थळी व वेळी मशाल मार्चच्या धावपटूंचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.