महादुला :- महानिर्मिती कंपनी कोराडी येथील, राख,रसायन मिश्रित पाणी महाजेन्को च्या प्रशासनाने सोडल्याने कोल्हार नदीच्या काठावरील वारेगाव, बिना गांव पुढे हेच पाणी, जुनी कामठी, कन्हान नदी ला जाते त्यामुले वारेगाव,बिना, जुनी कामठी,कन्हान या गावातील सार्वजनिक विहीरी, ग्रापं च्या पाणीपुरवठा योजना,पूर्णता दुषित झाल्याची तक्रार सभापती कामठी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे, (या वारेगाव) च्या,स्थानिक रहिवासी यांनी महाजेन्को कोराडी, यांना उद्या प्रत्यक्ष भेटुन हे राख व रसायनयुक्त आरोग्यास अपायकारक पाणी याची विल्हेवाट अन्यश्त्र कुठेही लावावी, असा सज्जड ईशारा त्यांनी त्यांच्या पत्रात मुख्य अभियंता कोराडी यांना दिलेला आहे.
या दुषित घाण पाण्याने, शेतकर्यांची जनावरे, दगावली आहेत काहींना आजाराने ग्रासले आहे,सामान्य जनतेच्या सर्वजानिक विहीरी, गावातील कुपनलिका, पाणिपुरवठा योजना देखील प्रदुषित झाल्याने यावर काही दिवसातच तोडगा न निघाल्यास आपण बिना, वारेगाव कामठीजूनी येथील रहिवासी व, त्यांच्या गो-धन सह महानिर्मिती कोराडी यांच्या कार्यालयात मोर्चा काढु असे त्यांनी सांगीतले आहे.