रानभाज्या महोत्सवातील ‘ रानभाज्यांनी ‘ वेधले लक्ष

– तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव संपन्न

– रानभाज्यांच्या १२ स्टॉल मध्ये शेतकर्‍यांनी केले अनेक रानभाज्यांचे प्रदर्शन

रामटेक :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रान भाज्या महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि 11/08/2023 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय रामटेक परिसरात घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी योगीता मुंडे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये यांचेसह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामभूमीतील देवलापार येथील अतिदुर्गम आदिवासी भागातील तसेच रामटेक मंडळ येथील नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या घेऊन शेतकरी , तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, यांनी विविध प्रकारच्या रान भाज्या विक्री करिता घेऊन आले व आपापले गटनिहाय तसेच वैयक्तिक शेतकरी निहाय स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये एकूण 12 स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये काटवल, बिंदा, तरोटा, कुडा, अंबुशी, पातुर, शेवगा, झोपा येणार बांबू खापुरकुटी कुरडू आघाडा काटेमाट घोड भाजी अंबाडी, मटारू, गुडवेल, भुई आवळा, सुरण, उंबर, करवंद, तांदूळजा, उंदीर कान ब्रह्मराक्षस अशा प्रकारच्या विविध भाज्यांची प्रदर्शनी ठेवण्यात आले त्या भाज्यांचे आहारात अनन्यसाधारण महत्व व औषधी गुणधर्म काय आहे. रानभाज्या मध्ये मोठया प्रमाणात खनिजे, जीवनसत्वे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक आहे , शुगर, बीपी व विविध आजारावर गुणकारी ठरणारे गुणधर्म आढळतात. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक रित्या ह्या माळरानात उगवतात त्याचे आहारातील महत्व लक्षात घेता रान भाजी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी 9 ते 15 आगस्ट दरम्यान करून त्यामध्ये रानभाज्यांची विक्री करण्यात येते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री उमाकांत प्रभाकर पोपळी शेतकरी सल्लागार समिती चे अध्यक्ष तसेच सरपंच शेखर खंडाते पिपरिया योगिता मुंडले उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक यांनी रानभाज्या या शहराच्या ठिकाणी जाऊन विक्री करायला पाहिजे त्यामुळे त्यांना दोन पैसे जास्त मिळतील मार्गदर्शन केले दिनेश भोये तालुका कृषी अधिकारी यांनी रानभाज्याचे महत्व व औषधी गुणधर्म तसेच अन्य कृषी विभागातील योजनांविषयी माहिती दिली राजेश दोनोडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन केले आभार प्रदर्शन तोडमल कृषी सहायक यांनी केले कार्यक्रमाला कृषी विभागामधील सर्व कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक यांनी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाला रामटेक शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला . त्यामध्ये विविध रानभाज्याची विक्री रुपये 8300 ही झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतक-यांना योग्य दाबाने वीजपुरवठयासाठी तेलगाव येथे पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर

Mon Aug 14 , 2023
नागपूर :- शेतक-यांच्या कृषी पंपांना योग्य दाबाने व गुणवत्तापौर्वक वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणच्या सावनेर विभागांतर्गत असलेल्या मोहपा उपविभागातील 33 केव्ही तेलगाव उपकेंद्रात अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचा रोहीत्र बसविण्यात आला आहे. या पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरचे चार्जिंग महावितरणच्या नागपूर मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतून तयार करण्यात आलेल्या कृषी अकस्मिकता निधीतून हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com