वन मजूर संवर्गातील बारा हजार पदे कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी सादर – वनसचिव वेणुगोपाल रेड्डी , वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांची ग्वाही

नागपूर :- राज्याचे प्रधान सचिव वने वेणुगोपाल रेड्डी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) शैलेश टेंभुर्णीकर यांच्या पुढाकारयाने महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या उपस्थितीत वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांची तक्रार निवारण सभा हरिसिंग सभागृह नागपूर येथे वन संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सभा आयोजित करण्यात आली. सदर वन संवाद सभेस महाराष्ट्र राज्याचे प्रधान वन सचिव वेणू गोपाल रेड्डी अध्यक्षस्थानी होते.

केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून वनरक्षक वनपाल वनमजूर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्षात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वन संवाद बैठकीत सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करणे, पदोन्नतीची निवड सभा महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी घेऊन एकसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावे, मोठे क्षेत्र असलेल्या नियत क्षेत्राचे पुनर्गठन करून वनरक्षक व वनपाल पदाच्या मंजूर पदात वाढ करावी, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करणे, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन महिन्याच्या पाच तारखेच्या आत करणे, वनरक्षक व वनपाल यांना अतिदुर्गम भागात गस्तीकरिता मोटरसायकलचा पुरवठा करणे, वनरक्षक वनपाल यांना अतिरिक्त कामाचा कर्तव्य भत्ता व आहार भत्ता पोलीस विभागाप्रमाणे मंजूर करणे, पोलीस विभागाच्या धरतीवर क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वन विभागातील भरती प्रक्रियेमध्ये 5 टक्के आरक्षण सवलत मिळणे, साप्ताहिक रजा व रजा कालावधीचे अतिरिक्त वेतन पोलीस विभागाप्रमाणे मिळणे, वन्यजीव विभागात दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात कार्यरत सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना एकस्तर पदाचे वेतन श्रेणी लागू करणे, अति संवेदनशील वन क्षेत्रातील वन संरक्षण, वन्यप्राणी संरक्षण अतिक्रमण गुन्हे दाखल करणाऱ्या वनरक्षक वनपाल यांचेवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर ते वृत्त स्तरापर्यंत पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेणे, प्रलंबित विभागीय चौकशीचे प्रकरणे तत्परतेने निकाली काढणे, सेवाविषयक अडीअडचणी सोडविणे करिता एकसूत्री कार्यक्रम राबविणे, वन संरक्षणाचे मापदंड निश्चित करणे, दिनांक 3/02/2023 शासन अधिसूचने प्रमाणे जोडपत्र तीन नुसार सुधारित वेतन निश्चिती करून आर्थिक लाभ मिळणे, दिनांक 25 /08 /2014 ते 4 /09/ 2014 हा संप कालावधी कर्तव्य कालावधी किंवा द्येय रजा गृहीत धरून संप काळातील वेतन मिळणे, पोलीस विभागाच्या धरतीवर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना व त्यांचे कुटुंबीयांना कॅशलेस आरोग्य योजना राबविणे, गणवेश व साहित्य भत्त्यात वाढ करणे, वनीकरण आणि जल व मृद संधारण कामासाठी अभिसरण योजना ची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरविणे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत्तर कामाचा निधी वर्ग न करणे, विभागीय चौकशी प्रस्तावित किंवा सुरू असलेल्या वनरक्षक व वनपाल यांना सामान्य प्रशासन शासन निर्णयानुसार पदोन्नती मिळणे, वन क्षेत्राचे पक्के सीमांकन व नकाशे अभिलेख अद्यावत करून पूरविणे, उत्कृष्ट कामगिरी करिता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देणे, महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र महिला कक्ष व प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, मानव वन्य जीव संघर्षाच्या घटना कमी करणे करिता उपाययोजना राबविणे, पदोन्नतीच्या संधी कमी असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सरळ सेवा भरती बंद करणे, बक्षी समिती खंड -2 नुसार वेतन निश्चिती करणे, वन कर्मचाऱ्यांच्या घर बांधकामासाठी लाकूड पुरवठा करणे, वन कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेकरीता शासकीय जागा मिळणे, संघटनेच्या कामाकरिता वृत्त स्तरावर कार्यालय उपलब्ध करून देणे, वन कल्याण निधीचा हिशोब बाबनीहाय सादर करणे, वन्यजीव विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना बस उपलब्ध करून देणे व वस्तीगृह सुरू करणे, सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पुरविणे, महाराष्ट्र नागरी सेवा ( जेष्ठतेचे विनिमय) नियमावली 2021 नुसार जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, प्रत्येक वृत्त व विभागीय कार्यालया चे परिसरात हुतात्मा स्तंभ उभारून त्यावर वन शहिदाचे नाव कोरणे, वणवनव्याबाबत उपाययोजना करणे, रोजंदारी वनमजुरांना शासन सेवेत कायम करणे, वनमजुरा मधून वनरक्षक पदावर पदोन्नती देणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या वनसेवा किंवा वनपाल पदामधून वन क्षेत्रपाल पदाचे सरळ सेवा भरतीत पदवीधर वनरक्षक व वनपाल यांना संधी देणे, वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली कायम प्रवास भत्ता 1500 रुपये वरून 5000 करणे बाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला, वनपालांना कार्यालय व इतर मूलभूत सुविधा, वनमजूर संवर्गातील पंधरा हजार पदे पुनर्जीवित करणार, वेतन श्रेणी सुधारणा अशा एकूण 40 विषयात तत्परतेने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही वन सचिव व वनबल प्रमुख यांनी दिली.

बैठकीला नागपूर वनवृताच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्यवंसंरक्षक श्री रामगावकर, गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक श्री रमेश कुमार तसेच सर्व उपवनसंरक्षक वन संवाद बैठकीला प्रामुख्याने उपस्थीत होते.

सदर वन संवाद बैठकीस चंद्रपूर गडचिरोली नागपूर येथील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री माधव मनमोडे, विशाल मंत्रिवार, भारत मडावी , सिद्धार्थ मेश्राम, अरुण पेंडोरकर, नितीन गडपायले उपस्थित होते.

सांगता राष्ट्रगीताच्या गायनाने करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेट्रो ट्रेन की समय सारणी मे बदल ; यात्री संख्या मे बढोतरी

Wed Jun 26 , 2024
– महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :-  दिनांक 24 जून (सोमवार) से नया शैक्षणिक सत्र शुरु हो चुका, महा मेट्रोने भी मेट्रो ट्रेन की समय सारणी मे बदल करते हुए यात्री सेवा हर 10 मिनिट मे उपल्बध कराई, इसी का फ़ायदा नागपुर मेट्रो कि यात्री संख्या मे हुआ है ! कल नागपुर मेट्रो रेल कि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com