देशात झालेल्या विक्रमी वायू निर्मितीबद्दल पंतप्रधानांनी केले नागरिकांचे अभिनंदन

नवी दिल्ली :- वायू उत्पादन क्षेत्रात देशाने आत्मनिर्भरतेच्या (स्वावलंबनाच्या) दिशेने नवीन विक्रम केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी X समाजमाध्यमावरील एका टिप्पणी मध्ये माहिती दिली की देशाने वायू उत्पादनाच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम साध्य केला आहे. 2020-21 मध्ये वायू उत्पादन 28.7 बी सी एम(अब्ज घनमीटर-बिलियन क्युबिक मीटर) होते. 2023-24 मध्ये ते 36.43 बीसीएम इतके वाढले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये वायू उत्पादन 45.3 बीसीएम असेल असा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या X वरील टिप्पणी वर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:

“या कामगिरीबद्दल देशवासियांचे खूप खूप अभिनंदन!

विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आपले स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. वायू निर्मितीचा हा विक्रम म्हणजे, या स्वावलंबनाच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेचा थेट पुरावा आहे.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“कलम 370 रद्द केल्यानंतरचे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या भविष्यातील विकासकथेचा पथदर्शक म्हणून उदयास येईल” - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Mon Aug 5 , 2024
नवी दिल्ली :-“कलम 370 रद्द केल्यानंतरचे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या भविष्यातील विकासकथेचा पथदर्शक म्हणून उदयास येईल”, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कलम 370 रद्द करण्याच्या 5 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जितेंद्र सिंह हे, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com