रेत माफिया सरपंचाला शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारी डीपीच्या परिसरही अपुरा

कोदामेंढी :- येथील मुक्कामी न राहणारा, घोटाळेबाज, रेत माफिया सरपंच आशिष बावनकुळे त्याच्या सावंगी येथे असलेल्या शेतासमोरील नदीकाठ परिसरातून सरपंच पदावर विराजमान होताच मागील दोन वर्षापासून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून लाखो रुपयांची माया जमवलेली आहे व तो आता शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या अगदी डीपी जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहे. त्यामुळे पोल तुटून डीपी पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून महावितरणच्या विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, वनविभाग ,नरेगा विभाग व संबंधित प्रशासन विभाग कारवाईच करत नसल्याने त्याचे कमावलेले लाखो रुपयांच्या मायेतून या सर्व स्थानिक विभागाशी आर्थिक संबंध असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात असून संबंधित वरिष्ठ विभागातील अधिकाऱ्यांनी या मुक्कामी न राहणाऱ्या घोटाळेबाज रेतिमाफिया आशिष बावनकुळे वर कारवाई करून त्वरित सरपंच पदावरून पदमुक्त करण्याची मागणी येथील त्रस्त शेतकरी, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवसेना (उबाठा) पक्षाला बळ देणा-या एकनिष्ठ प्रकाश जाधवांनाच रामटेकची उमेदवारी द्या

Thu Oct 17 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कुंटुब प्रमुख, पक्ष प्रमुखांच्या निर्णयाकडे रामटेकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे लक्ष कन्हान :- मानवी जीवनात मुल्यांना अधिक महत्त्व आहे. परंतु आधुनिक काळात मुल्यांना व्यवस्थेने तिलां जली दिलेली दिसुन येत आहे. इमानदार आणि बेईमा न यांच्यातील स्पर्धेत कलयुगी बेईमानच जिंकताना दिसतो. राजकीय पक्ष प्रवेशानंतर सलग पक्षाशी एक निष्ठ राहिलेले कार्यकर्ते सद्या बोटावर मोजण्या इतपर उरलेले आहेत. स्वार्थासाठी कपडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com