संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकाधिकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार कृपाल तुमाने यांची भेट घेऊन मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या परताव्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. पल्स या संस्थेच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे दोन-तीन महिन्यांमध्ये पैसे मिळणार असल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असेही म्हणाले. जर मैत्रेयच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत पाहिजे असतील तर आपल्याला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागेल असेही खासदार कृपाल तुमाने म्हणाले. त्यासाठी लोकाधिकार परिषदेची मदत करणार असे आश्वासन सुद्धा कृपाल तुमाने यांनी दिले. सुप्रीम कोर्टात गेल्याशिवाय मैत्रेयच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना न्याय मिळणार नाही असेही ते म्हणाले. यावर लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी खा. कृपाल तुमने यांना माहिती दिली की महाराष्ट्र सरकारने मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांची केस मुंबई येथील MPID सेशन कोर्टामध्ये टाकली आहे. यावर खासदार तुमने यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हणाले राज्य सरकारने कोर्टात जायला नको होतं. मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा इतकी गंभीर चर्चा लोकाधिकार परिषदेने घडवून आणली. मुंबई येथील MPID कोर्टातून मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या केसची वर्तमान स्थितीची माहिती घेऊन सुप्रीम कोर्टात मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधीची केस दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार कृपाल तुमाने हे मदत करणार आहेत. याप्रसंगी लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब व महासचिव माया उके यांनी खासदार कृपाल तुमाने यांचे आभार मानले. याप्रसंगी लोकाधिकार परिषद कार्यकारणीच्या सदस्या मंगला हांडे, कलावती नळे, मंदा आत्राम, शंकर पाचोरे, ज्ञानेश्वर उके,गौरी सदावर्ते, रीना रायपुरे, उषा खैरे, शालिनी पाटील, छाया भगत, शालिनी व्हि. पाटील, रंजना हजारे, सुजा ब्राह्मणे उपस्थित होत्या.