नागपूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– रेशीमबाग येथील स्नेहमिलन कार्यक्रमात सहभाग

नागपूर :- नागपुरात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची कामे केली. नागपूर कात टाकत आहे. पण मी एवढ्यावर समाधानी नाही. नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेच माझे ध्येय आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.

रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ना. नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका कांचन गडकरी, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. नितीन गडकरी यांना लोकसभा निडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सभागृहात उपस्थित लोकांनी संकल्प केला. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘नागपूर झिरो माईल आहे, टायगर कॅपिटल आहे, लॉजिस्टिक कॅपिटलच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. नागपूर आता एव्हिएशन हब म्हणूनही नावारुपाला येत आहे. नाग नदीच्या प्रकल्पासाठी देखील २४०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्याचेही काम सुरू होत आहे. मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि येत्या काळात १ लाख तरुणांना नव्याने रोजगार मिळणार आहे. नागपूरमध्ये एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, सिम्बायोसिस आले. त्यामुळे आता नागपूर एज्युकेशन हब होत आहे.

शैक्षणिक विकास, उत्तम रस्ते आणि उड्डाणपूल, आरोग्याच्या सुविधा, चोवीस तास पाणी यावर माझा भर राहिला. दिला. आता साडेतीनशे खेळाची मैदाने तयार करायची आहेत, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जलतरण केंद्र तयार करायचे आहेत. याशिवाय सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्माशी संबंधित महोत्सव आयोजित केले. सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना सहभागी करून घेतले. शहरातील सुख-दुःखात सामील होऊन सगळी कामे केली. जात-पात-धर्माचा विचार कधी केला नाही आणि कधी करणारही नाही, असेही ना. नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एनएमसी और जीवीएफ ने अर्थ ऑवर मनाया

Sun Mar 24 , 2024
नागपुर :- नागपुर महानगर पालिका एवं ग्रीन विजिल फाउंडेशन ने 23 मार्च को रात 8.30 से 9.30 बजे तक वर्ल्ड ट्रेड सेंटर, सीताबर्डी नागपुर सहित बर्डी में अर्थ ऑवर मनाया। अर्थ ऑवर, वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड फॉर नेचर (WWF) द्वारा आयोजित एक विश्वव्यापी अभियान है।https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 यह आयोजन, हर साल मार्च महीने मेंआयोजित किया जाता है, जिसमें व्यक्तियों, समुदायों और व्यवसायों को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com