अरोली :- आंध्रप्रदेशात संक्रांति हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामुळे तेथील परंपरा मौदा तालुक्यात विविध गावात राहणारे आंध्रीयन समाजातील अनेक परिवारातर्फे 14 जानेवारी मंगळवार ला संक्रांतीच्या दिवशी घरासमोरील अंगणात आकर्षक रांगोळ्या टाकून व हॅप्पी पोंगल हा नाव लिहून त्यामध्ये पुष्प व बोरं ठेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मांगली तेली येथील रेवराल – धानला रोडावर स्थित असलेले मुम्मानेनी दांपत्याचे घरासमोरील खूप मोठं असलेल्या अंगणात काढलेली आकर्षक रांगोळी व त्यामध्ये दोन्ही प्रवेशद्वारासमोर हॅप्पी पोंगल लिहिलेले नाव रोडावर येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करत होती.
याबाबत ममता भुजंगराव मुम्मानेनी यांना विचारपूस केली असता, आंध्र प्रदेशात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो व या सणाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात राहणारे आंध्र प्रदेशातील लोक हा सण महाराष्ट्रातही याच प्रकारे साजरा करीत असल्याचे सांगितले.