मुक्या वृद्ध महिलेला पोलिसांनी सुखरूप पोहचवले घरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील पटेल न्यूज पेपर एजन्सी जवळ मुकी दिव्यांग असलेली एक वृद्ध महिला भरकटलेल्या स्थितीत आज सकाळी 9 वाजेदरम्यान आढळली असता पोलिसांनी वेळीच तर्कशक्तीच्या आधारावर सदर वृद्ध महिलेच्या घरचा पत्ता शोधून तिला सुखरूप घरी पोहोचवून माणुसकीचा धर्म जोपासत कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

सुखरूप घरी पोहोचलेल्या या मुक्या दिव्यांग वृद्ध महिलेचे नाव शांताबाई शंकरराव निनावे वय अंदाजे 70 वर्षे रा कळमना नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वृद्ध महिला भरकटलेल्या स्थितीत कामठीत पोहोचली असता तिने आधार म्हणून कामठी च्या बस स्टँड चौकातील पटेल न्यूज पेपर एजन्सीचे संचालक कृष्णा पटेल यांच्याकडे आली.याप्रसंगी तिला बोलता येत नसल्याने कुठे जायचे, कुठून आली असे काहीही सांगता येत नव्हता मात्र तिचा केविलवाणा प्रकार हा कृष्णा पटेल यांना राहावेसे न झाल्याने माणुसकीच्या नात्यातून त्या वृद्ध महिलेला खाऊ घालून भूक भागविली व अंतता तिला सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सदर महिलेसंदर्भात माहिती दिली असता पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून तिला सोबत नेऊन तिच्याशी योग्य विचारपूस केली असता तिला बोलून सांगता येत नसल्याने तर्कशक्तीच्या आधारावर योग्यरित्या शोध लावून कळमना येथे तिच्या घरी सुखरूप पोहोचविल्याने कुटुंबियांत आनंदाचे वातावरण पासरले व पोलिसांचे कौतुक करीत आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इशरत जहां के समर्थक जितेंद्र आव्हाड क्या स्वयं को वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानते हैं ?

Wed May 29 , 2024
– ‘मनुस्मृति’ जलाई गई, तो इसे आचारसंहिता के उल्लंघन मानकर उनके विरुद्ध अपराध पंजीकृत करें ! – हिन्दू जनजागृति समिति महाराष्ट्र राज्य सरकार के नए शैक्षणिक पाठ्यक्रम के प्रारूप के अनुसार क्रमिक पुस्तक में छात्रों को नैतिक मूल्य एवं चरित्र की शिक्षा देनेवाले पाठ में मनुस्मृति में समाहित ‘अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम ।’ (अर्थ : वरिष्ठ नागरिकों, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com