मनपाच्या पथकाने केली शहरातील पतंग विक्रीच्या दुकानात तपासणी; नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी कठोर पावले

चंद्रपूर :- प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केले आहे. नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले असून, मनपाच्या पथकांनी शहरातील विविध पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन नियमित तपासणी केली जात आहे.

नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई कारवाई करण्यात येणार आहे.

नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने गठीत पथकाने शहरातील विविध भागात असलेल्या पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन तपासणी केली. शिवाय नायलॉन मांजा विकू नये, असे सुद्धा सुचित करण्यात आले.

दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहेत. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

Sat Dec 10 , 2022
संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.   शहाजीराजे क्रीडा संकूल अंधेरी येथे मुंबई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com