उठला वेश्यांचा बाजार कामांध ग्राहकांनी बेजार 

सुरुवातीपासून जवळपास 56-57 हजार मताधिक्य असणारे आमच्या बांद्रा लोकसभा मतदार संघात ऍडव्होकेट उज्वल निकम हे प्रचंड मताधिक्य घटून केवळ 8-10 हजारांच्या फुटकळ मताधिक्याने पराभूत का झाले त्यावर उत्तर अतिशय सोपे आहे, आपल्या या महाराष्ट्रात शासकीय प्रशासकीय अधिकारी मीडिया आमदार मंत्री असे विविध नेते फुलटाइम व्यावसायिक असतात, भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत केवळ काळ्या कमाईचा विचार त्यांच्या डोक्यात असतो आणि फावल्या वेळात ते त्यांच्या मूळ व्यवसायाकडे कर्तव्याकडे थोडेफार लक्ष देतात, ज्या वर्षा गायकवाड यांचा आमच्या लोकसभा मतदार संघाशी काडीचाही संबंध नाही, या लोकसभा मतदार संघात त्यांचे साधे वास्तव्य देखील नसतांना या अशा उच्चभ्रू हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून त्या अजिबात प्रचार न करता निवडून येतात विशेष म्हणजे भाजपाचे संपूर्ण मतदार संघावर हुकूमत असतांना देखील त्या निवडून येतात कारण या लोकसभा मतदार संघाशी संबंधित सारेच आमदार पार्टटाइम नेते आहेत आणि फुल टाइम धंदेवाईक आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून अवाढव्य कमाई करवून देणारे त्यांचे सारेच व्यवसाय आहेत आणि थोड्याफार फरकाने हेच दृश्य महाराष्ट्रात सर्वदूर आहे म्हणजे चंद्रपूर पासून तर थेट गोव्याच्या टोकापर्यंत वर सांगितलेले सारेच्या सारे काळ्या कमाईच्या व्यवसायात सतत गुंतलेले असल्याने ये तो होना ही था !!

निवडणुकीत भाजपा महायुतीचा मोठ्या पराभवास आणखी एक महत्वाचे कारण, एक घडलेला सत्य किस्सा सांगतो. त्या पत्रकाराचे नाव सांगत नाही पण आता वयोवृद्ध असलेल्या एका दैनिकात शेवटपर्यंत केवळ वार्ताहर म्हणून काम करणार्याने मीडियातल्या इतर बहुतेक दलालांसारखी आयुष्यभर दलाली केली, नेते अधिकारी मंत्री मुख्यमंत्री अनेकांवर मीडियाच्या संघटनेचा खुबीने वापर करीत दबाव आणून कमाईची कामे करवून घेत दरदिवशी घरी बक्कळ काळा पैसा आणण्याशिवाय पत्रकारितेत समाजासाठी कोणतेही योगदान दिले नाही. त्याला एक छुपा षोक होता, लेडीज बार मध्ये जाण्याचा, ठाणे जिल्ह्यातल्या एका विशिष्ट बार मधली एक बारबाला त्याला खूप आवडायची तिच्यावर तो पैसे उधळायचा, अत्यंत धक्कादायक म्हणजे त्याच बारबालेला एक दिवस त्याच्या मुलाने चक्क लग्न करून पत्नी म्हणून घरात आणले नेमके हेच राज्यातल्या विशेषतः भाजपाबाबत फार मोठ्या प्रमाणावर तेही दिल्लीतल्या नेत्यांच्या सांगण्यावरून घडले, ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी त्यांना महायुतीमध्ये स्थान दिले वरून सत्ता दिली आणि येथेच महायुतीने विशेषतः भाजपाने स्वतःच्या पायावर फार मोठा धोंडा पाडून घेतला. या किळसवाण्या निर्णयावर मतदार रुसले त्यांना नैराश्य आले आणि याच नैराश्येपोटी त्यांनी मतदान केले नाही मतदान करायला ते बाहेर पडले नाही, सहलीला बाहेर निघून गेले…

अर्थात सारे पुरावे पुढे मी व्यापक मांडणार आहेच पण आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, राज्यातल्या जातीच्या राजकारणाचा, एकही दलित मुस्लिम आणि मराठा तसेच कुणबी मतदाराने विशेषतः भाजपा उमेदवाराला अजिबात मतदान केले नाही वरून हे सारेच मतदार अगदी ठरवून मतदानाला बाहेर पडले आणि भाजपाशिवाय त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करून आले विशेष म्हणजे जरांगे इफेक्ट भाजपाला गोत्यात आणण्यास कारणीभूत ठरला पण याच कुणबी मराठा मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातल्या उमेदवारांना मात्र का मतदान केले ते नेमके समजलेले नाही. आपल्या या राज्यात समस्त मुस्लिमांचा सर्वाधिक मोठा शत्रू इतर कोणीही नसून त्यांच्या मनात प्रचंड राग अर्थात उज्वल निकम यांच्याविषयी असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे उज्वल निकम यांच्या ऐवजी निवृत्ती पोलीस अधिकारी जावेद अहमद यांना उमेदवारी देणे नक्कीच उचित ठरले असते, दुर्दैवाने अहमद यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आणि निकम यांना उमेदवारी देण्यात आली त्यातून सर्वाधिक जहाल प्रचार विशेषतः प्रत्येक मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणावर केल्या गेला आणि कच्चे लिंबू वर्षा गायकवाड निवडून आल्या त्याचे खापर नक्कीच भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या आमदारांवर फोडणे गरजेचे आहे. मित्रांनो, वीर सावरकरांचे शब्द आज पुन्हा अधोरेखित झाले, मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या हिंदूंची…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुनः निर्वाचित सांसद गडकरी का चेंबर द्वारा सत्कार

Thu Jun 6 , 2024
नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने चेंबर के प्रतिनिधीमंडल के साथ नितीन गडकरी से उनके वर्धा रोड स्थित निवास स्थान पर जाकर उन्हें लगातार तीसरी बार सांसद बनने के उपलक्ष में हार्दिक बधाई दी।  अर्जुनदास आहुजा ने नितीन गडकरी का शाॅल, पुष्पगुच्छ व श्रीफल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com