पाहणी दौरा..रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार..!

नागपूर, दि. 4 : पाहणी दौरा… उत्साह…गतीचा थरार…. विदर्भासाठी खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’चा महामार्ग ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आज उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले… निमित्त होते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौ-याचे.

कुठल्याही देशाच्या विकासात रस्ते विकासाचे जाळे अत्यंत महत्वपूर्ण ठरते,असे म्हणतात. देशाच्या विकासाचा मानबिंदू हा रस्ते असतो. या रस्त्यांचे जाळे गतीमान असेल तर गतीमान विकासाला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात 11 डिसेंबर रोजी लोकार्पण होत असलेला हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भाला पर्यायाने राज्याला अग्रेसर करण्याचे एक माध्यम ठरणार आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्याचा उत्साह आज शिगेला पोहोचला होता. या उत्साहानंतर खऱ्या अर्थाने या रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना आज अनुभवायला मिळाला. लवकरच तो सर्वसामान्यांनाही अनुभवायला मिळणार आहे.

राज्याच्या विकासात अत्यंत मोलाची भूमिका बजावण-या समृद्धी महामार्गाविषयी एक आपुलकीचे चित्र आज समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौ-यादरम्यान पहायला मिळाले. नागपूरपासून सुरू झालेला हा दौरा शिर्डीपर्यंत आयोजित करण्यात आला. विमानतळापासूनच याचा प्रत्यय आलेला पहायला मिळाला. विमानतळावर अनेक नागरिक हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिमहोदयांना भेटायला, आभार मानायला उत्सुक होते.

विदर्भवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा आनंद वैदर्भीयांच्या चेह-यावर पहायला मिळाला. केवळ विमानतळावरच नव्हे तर पाहणी दौ-याच्या झिरो पॅाईंट या ठिकाणीही स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही या महामार्गामुळे वाढणार असून यातून विदर्भाचा विकास होण्यास मदत होणार असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया स्थानिकांनी यावेळी दिली.

थोडक्यात समृध्दी

एकुण लांबी:- 701 किमी. ,

रस्त्याची रुंदी :- 120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)

मार्गीका :- 3+3 मार्गीका

वाहन वेग प्रस्तावित :- 150 किमी/तास (डोंगराळ भागासाठी 120 किमी./तास)

प्रस्तावित इंटरचेंजेंस :- 25

रस्त्यालगत उभारण्यात येणा-या नवनगरांची संख्या:- 18

मोठे पुल :- 32

लहान पुल :- 317

बोगदे :- 7

रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8

व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73

कल्व्हर्ट :- 762

किती जिल्ह्यातून, तालूक्यातून व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे

वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ दीक्षित यांचा केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्या हस्ते सत्कार..

Sun Dec 4 , 2022
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल खासदार महोत्सवात झाला सत्कार नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने आज केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रजेश दीक्षित यांचा आज सत्कार करण्यात आला. शहरातील ईश्वर देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!