घरफोडी करणारा व चोरीचा माल घेणारे आरोपीना कन्हान पोलिसांनी केले गजाआड 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात चो-या, घरफोडया वाढल्याने कन्हान पोलीसानी अट्टल घरफोडी करणारा आरोपी तेनाली यास पकडले. त्याचे सोबती फरार असल्याचे सागुन चोरीचा गुन्हा कबुल केला. तसेच चोरीचा माल विकत घेणा-या दोघाना ताब्यात घेऊन त्याच्या जवळुन मुद्देमाल जप्त करून तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कन्हान पोलीस स्टेशन येथे दाखल अप क्र. ३९५/२४ कलम ४५४, ४५८, ३८० भादंवि अन्वये गुन्ह्य (दि.०७) जुन २०२४ ला फिर्यादी प्रीति ज्ञानेश्वर महुर्रे वय ३४ वर्ष रा. संताजी नगर वार्ड क्र ०५ कन्हान ता. पारशिवनी यांचे तक्रारीवरून दाखल केला होता. यात फिर्यादी ही (दि.०६) जुलै ला रात्री ०८ वाजता नातेवाईकांकडे वाढदिवसा निमित्य सहपरिवार गेली. व (दि.०७) जुन ला सायंकाळी सर्व घरी आले असता त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडुन अज्ञात चोराने आत प्रवेश करून आरमारीचे कुलुप तोडुन सोन्याचे दागिने व नगदी असे एकुण ५०,००० रूपयाचा माल चोरी केला. सदर गुन्ह्याच तपास सपोनि राहुल चव्हाण डीबी पथकासह करित असता गुन्ह्यांची पद्धत बगुन तांत्रिक पद्धतीने व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी तेनाली यांनी चोरी केल्याचे सम जले. तेनाली हा फरार असल्याने कन्हान पोलीस त्या च्या मागावर होती. दीड महिन्या नंतर आरोपी कन्हान ला आला असता सापडा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्याचा घरफोडी मधिल सोबती अजुन फरार असल्याची माहीती दिली. व ज्यांना सोन्याचे दागिने विकले. ते १) अविनाश शेंडे वय २५ रा खापरखेडा, २) मंथन उर्फ दाऊद मोहुर्ले वय २५ रा. बुट्टीबोरी त्यांना पण ताब्यात घेऊन कबुली दिल्याने आरोपी बनविण्यात आले. व त्याच्या ताब्यातुन सर्व सोन्याचे दागिने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांचा मार्गदर्शनातं वरिष्ट पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि राहुल चव्हाण, पोहवा हरीश सोनभद्रे, पोना अमोल नागरे, महेश बिसने, पोशी अश्विन गजभिये यांनी यशस्विरित्या पर पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्पमित्राने अजगर सापाला पकडुन दिले जीवनदान

Wed Jul 31 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- वाईल्ड अँनिमल अँड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था नागपुर च्या सर्पमित्रानी कोळसा खदान नं. ६ येथुन एक अजगर प्रजातिचा ६ ते ८ फुटाचा साप पकडुन त्यास वन विभागाच्या जंगलात सोडुन जीवन दान दिले. कन्हान ला लागुनच असलेल्या कोळसा खदान नं. ६ येथे मंगळवार (दि.३०) जुलै २०२४ ला रात्री ९ वाजता दरम्यान एक अजगर प्रजातिचा ६ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com