शेकडो कार्यकर्त्यांसोबत आम आदमी पार्टीने मिरवणुक काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना जयंती निमित्य मानवंदना दिली

नागपूर :– ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध शेकडो तरुण कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.

शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकूळकर, शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे , वरिष्ठ नेते डॉक्टर शाहिद जाफरी, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव सोनू फटिंग, राज्य युवा आघाडी राज्य संघटन मंत्री प्रणित डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवतीर्थ गांधी गेट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आम आदमी पार्टी चे शहर युवा अध्यक्ष शुभम मोरे यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला पार्टीचे शहर महासचिव डॉक्टर अमेय नरनावरे, अरुण ज्योती कन्हेरे, संघटनमंत्री रोशन भाऊ डोंगरे, सचिन वाघाडे, संघटन मंत्री संगीता बाथो,उपस्थित होते.

गांधी गेट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूणार्कृती पुतळ्यावर सचिन वाघाडे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. शेकडो शिवभक्त या वेळी पारंपरिक पोशाखात शिवभक्त स्वराज्य रथात सहभागी झाले होते. या वेळी विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संघटन सचिव भूषण ढाकुळकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे ढाकुळकर यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनीही मनोगत व्यक्त केले.त्यांनी शिवरायांची लोकशाही, शिवरायांचे रयतेविषयी असलेले प्रेम, शिवरायांची राजनीती आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून दिली.

मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम आदमी पार्टी तर्फे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साजरी करण्यात आली. या वेळी चांद्रशेखर पराड, मोहन मांगर, संजय बोरकर, शैलेश गाजबीए, नफिस शेख, तेजराम साहू, नफिस शेख, चेतन निखारे, स्वीपनील सोमकुवर, पंकज मेश्राम, हरीश वेळेकर, विजय नंदनवार सर, अलका पोपटकर, पुष्पा डांबरे, गिरीश तितरमारे, पिंकी बारापात्रे, महेश बावनकुळे, विशाल वैद्य, जॉय बंगडकर, नरेश महाजन इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

Tue Feb 20 , 2024
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने मंगळवारी (दि. २०) राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com