रागाच्या भरात पतीनेच केला पत्नीचा खुन

पोलीस स्टेशन कळमेश्वर :- अंतर्गत यातील फिर्यादीचे वडील नामे- गणेश घोडस्वार हे कंपनीतून काम सोडुन मागील दोन वर्षापासुन घरी बसले होते. व ते नेहमी कोणत्याही कारणाने पत्नीवर संशय घ्यायचे व झगडा भांडण मारपीट करायचे. नेहमी मारपीट करीत असल्याने फिर्यादीची आई पागलासारखी करू लागली होती. तेव्हापासून फिर्यादीचे वडील हे फिर्यादीने आईची आंघोळ व जेवण घालत होते. दिनांक ०९/०६/२०२३ २०/०० वा दरम्यान, फिर्यादीचे वडीलांनी मृतक हीला आंघोळ करण्यासाठी म्हटले असता मृतक हीची तब्बेत बरी नसल्याने “मी आंघोळ करीत नाही असे म्हटले असता फिर्यादीचे वडीलांनी रागाचे भरात तिला हाताने मारहाण करू लागल्याने आई ओरडली असता, फिर्यादीने स्वता बाहेर येवुन पाहीले. असता फिर्यादीचे चे वडील मृतकाचे केस पकडुन तिचे डोके बाथरूमचे भिंतीवर आपटत होते. मृतक ही बाथरूममध्ये लुस्त पडल्याने फिर्यादीने व मृतकचे पतीने हात पकडुन घरात आणले व झोपवुन दिले. त्यानंतर ०८/०० वा दरम्यान मुलीने जेवण करायला विचारले असता, मृतक होने मान हलवून जेवण्यास नकार दिला. नंतर सगळे झोपी गेले. दुसरे दिवशी दि. १०/०६/२०२३ से ०६/३० वा. दरम्यान सकाळी फिर्यादी ही मृतक जवळ गेली असता तिचे डोळे अर्धवट उघडे होते. व शरीर कडक आले होत. फिर्यादीने वडीलांना सांगितले असता, वडीलांनी “तुझी आई मरण पावली आहे”, असे सांगितले.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे – भूमिका गणेश घोडेस्वार वय १७ वर्ष रा सावली माउली तह कळमेश्वर जिल्हा – नागपूर चे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपी नाम- गणेश घोडेस्वार वय ४९ वर्ष ग सावली माउली तर कळमेश्वर यांचे विरूध्द कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / हरिचंद्र गावडे हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धान्य चोरी करणा-या आरोपविरुध्द कारवाई

Mon Jun 12 , 2023
पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत आयुडिपी काटोल १ किमी पूर्व यातील फिर्यादीचे बंद गोडावून मधुन तुरीचे ९ कट्टे प्रत्येकी ६० किलो किंमती ६,०००/-रू कट्टा असा एकून ५४,०००/- रु या माल दिनांक २९.०५.२३ ते १०.०६.२३ चे ०१.०० ते ०७.०० वा दरम्यान यातील नमुद आरोपीतांनी चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी नामे- तुषार दत्तराव राजुरकर वय ३५ य आयुडिपी काटोल जि नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com