– बेला पोलीस स्टेशनची कार्यवाही
बेला :- दिनांक ११/०३/२०२४ रोजी अपराध कंमाक ९१/२४ कलम ३८०, ४५४, ४५७ भा.द.वि. अन्वये पोलीस स्टेशन बेला येथे दिनांक ०९/०३/२०२४ चे ११.०० वा. ते दिनांक ११/०३/२०२४ चे १०.०० वाजता दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा येथील शाळेतील कोणीतरी अज्ञात चोराने कार्यालयाचे व दोन वर्ग खोल्याचे दाराचे कुलूप तोडुन शाळेमधील दोन वर्ग खोल्यामधील रेकॉर्ड व सन २००२ मधिल घेतलेले जुने वापरते कॉम्प्युटर, जुने वापरते साउंड सिस्टम मशिन, विदयुत जोडणी बोर्ड अंदाजे व एक छोटा स्पिकर अंदाजे असा एकुण ६,२००/-रू. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीसांनी अज्ञात आरोपीचा गोपनिय माहीतीचे आधारे शोध घेवून संशयीत दोन विधीसंघर्ष बालक यांना त्यांचे पालक यांचे समक्ष ताब्यात घेवुन चौकशी केली असता दोन विधीसंघर्ष बालक सदर गुन्हा केल्याचे कबुल केले व गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल १) जुने वापरते कॉम्प्युटर किंमत अंदाजे ४०००/-रु. २) जुने वापरते साऊंड सिस्टीम मशीन अंदाजे किंमत १०००/-रू. ३) विद्युत जोडनी बोर्ड अंदाजे किंमत २००/- रु. ४) एक छोटा स्पीकर अंदाजे किं. १०००/- रु असा एकुन ६,२००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदरची कारवाई हर्ष पोहार पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रा) रमेश धुमाळ, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, पुजा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, नागुपर विभाग नागपुर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम, प्रभारी ठाणेदार पोस्टे वेला, पोहवा कुणाल ठाकुर सिर्सी चौकी इन्चार्ज, पोशि. अमोल काटेवार व चापोहवा प्रविण नैनवार यांनी केली आहे.