संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जेष्ट नागरिक, हेल्पिंग विंग, कार्यकारिणी सदस्य व व्हिजनरी युवा पिढी ह्यांच्या अथांग महिनत, जिद्द व चिकाटी मुळे ग्रंथालयाचे काम अवघ्या १६ महिन्यात पूर्ण झाले असून आता ह्या ग्रंथालयाचा व वाचनालयाचा विद्यार्थ्याना लाभ घेता येईल.
येणाऱ्या ०६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २ वाजता, जयस्तंभ चौक, कामठी, नागपूर येथे माननीय प्रदीप शांताराम फुलझेले ह्यांच्या अध्यक्षते खाली, डॉ. सिद्धार्थ गायकवाड (उद्घाटक), प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर अक्षय खोब्रागडे (प्रमुख पाहुणे), मुख्य कार्यकारी अधिकारी, सलाम किसान, मुंबई ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा आयोजित केला गेला आहे.
शाहू फुले आंबेडकरी या महापुरुषांची विचारधारा जपणारी पिढी हल्ली संपली किंवा काळ बदलला आणि काळाच्या ओघात माणसंही बदलत चालली असे आपण अनेकदा म्हणतो परंतु नागपूर जिल्यात कामठी या ठिकाणी महापुरुषांच्या विचार जगवणारी आणि विचाधारा स्वतः अमलात आणून तिचा प्रचार- प्रसार करून समाजउपयोगी कार्यक्रम नेहमी राबवत असणारी तरुण पिढी नेहमी च समाजासमोर आपला आदर्शतेचा ठसा उमटवत आहे.
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारित क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती अंतर्गत जेष्ट नागरिक, हेल्पिंग विंग व व्हिजनरी युवा पिढी ह्यांच्या सहभागातून अवघ्या १६ महिन्यांमध्येच भव्य लायब्ररी उभारण्यात आली. विशेष म्हणजे या अभ्यासिकेसाठी सुरुवातीपासून तर शुशोभीकरणापर्यंत सर्व खर्च हा संस्थेतील सदस्यांच्या स्वखर्चातून करण्यात आलेला आहे, कुठलीही मदत त्यांनी कोणाकडूनही घेतलेली नाही.
समाजासाठी खरंतर एव्हढ्या तडपेने आणि आवडीने काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती या समाजामध्ये सहसहा दिसत नाहीत परंतु क्रांतिकारी आणि उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणजे क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती या समितीचे व वाचनालयाचे मुख्य उद्देश म्हणजे शैक्षिणक क्षेत्राला चालना देणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, अर्थिक मागासलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता मुबलक सुविधा व मार्गदर्शन देणे, करिअर मार्गदर्शन, फेलोशिप प्रोग्राम, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन, स्कॉलरशिप चे महत्व व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे आणि हे सर्व संस्थेमार्फत अगदी मोफत पणे देण्यात येणार आहे. क्रांतिकारी संत कबीर वाचनालयाचे ध्येय विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षिणक विकास करणे असून भारताचे प्रतिनिधत्व करणारे IAS, IPS, Doctor, Engineer, Lawyer, CA, Teacher घडविणे हे आहे.
जेष्ट नागरिक, हेल्पिंग विंग, कार्यकारिणी सदस्य व व्हिजनरी युवा पिढी ह्यांच्या अथांग महिनत, जिद्द व चिकाटी मुळे ग्रंथालयाचे काम अवघ्या १६ महिन्यात पूर्ण झाले असून आता ह्या ग्रंथालयाचा व वाचनालयाचा विद्यार्थ्याना लाभ घेता येईल.
येणाऱ्या ०६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २ वाजता, जयस्तंभ चौक, कामठी, नागपूर येथे प्रदीप शांताराम फुलझेले ह्यांच्या अध्यक्षते खाली, डॉ. सिद्धार्थ गायकवाड (उद्घाटक), प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर अक्षय खोब्रागडे (प्रमुख पाहुणे), मुख्य कार्यकारी अधिकारी, सलाम किसान, मुंबई ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा आयोजित केला गेला आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, पालक वर्गांनी उपस्तिथी दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व मार्गदर्शन घ्यावे अशी विनंती आयोजकांकडून केली जात आहे.