– तीन ट्रॅक्टर केले जप्त
अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डव्वा ते चीरचाडी मार्गावर वन विभागाच्या जागेतून अवैध रित्या मुरुम उत्खनन करून वाहतूक करीत अश्ल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली.
त्या माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाला थांबवुन उत्खनना बाबत आपल्याकडे परवाना बाबद चौकशी केली असता. त्यांच्याकडे कोणताही परवाना उपलब्ध नव्हता. हा मुरूम डव्वा ते सडक अर्जुनी या मुख्य मार्गावर टाकण्यात येत होता. यात वाहन चालक विशाल सोमेलाल सराटे, उमाकांत मनोहर लंजे, भूपेश कन्नुलाल उईके सर्व राहणार चीरचाडी, कोहडीटोला असे असून तीन ट्रॅक्टर क्रमांक अवैध उत्खनन चीरचाडी वन परिसरातील गट क्रमांक : १२२ येथे करत असताना रात्री ची वेळ असल्याने जेसीबी पळवून नेली.
तर सदर जेसीबी कुणाची होती याचा शोध चालू आहे. ट्रॅक्टर द्वारे अवैध्य रित्या मुरूम उत्खन करणाऱ्या सर्व आरोपीना वन विभागाने गुन्हा नोंद करून सदर वाहन सह वनक्षेत्र जांभळी कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आली आहेत.