विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पालांडे, उपायुक्त (पुनर्वसन) अमोल यादव, उपायुक्त (रोहयो) रेवती गायकर, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (आस्थापना) मिनल कुटे,उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, उपायुक्त (पुरवठा) अनिल टाकसाळे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत कोकण भवन इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती. “हर घर तिरंगा” या संकल्पनेवर आधारित आकर्षक असे शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी आणि सेल्फी पॉईंट इमारतीच्या आवारात उभारण्यात आले होते.

यावेळी महसूल पंधरवड्यानिमित्त महसूल संवर्गातील पुनर्वसन शाखेचे उपायुक्त अमोल यादव, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या नायब तहसिलदार दिपाली पुरारकर, नायब तहसिलदार सुहास सावंत यांच्यासह लघुलेखक संवर्ग, वरिष्ठ लेखापाल संवर्ग, अव्वल कारकून संवर्ग, महसूल सहाय्यक संवर्ग, आणि महसूल मित्र अशा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश धनसिंग ठाकरे, तुर्भे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भगवान वाघ आणि तुकाराम सुरेश नांगरे, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश आनंदा पाटील, सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल रामराव मुंडे, कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शाहूराव नवले, नाव्हाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भरत पोफळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डेंग्यू, चिकनगुनिया आधीच पसरले; आता पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ - आमदार विकास ठाकरे

Fri Aug 16 , 2024
– कामगारांच्या संपानंतरही नागपूर महापालिकेने कचरा कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नाही नागपूर :- महायुती सरकार आणि नागपूर महानगरपालिका यांची पावसाळ्यापूर्वी डेंग्यू, चिकनगुनिया अशा इतर डासांमुळे होणारा रोगांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी होती. दुर्दैवाने, नागपूरमध्ये पाणी तुंबल्यानंतर, आता डेंग्यू, चिकनगुनिया अशा इतर डासांमुळे होणारा रोग पसरले आहेत. एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे शहरभर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!