संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मौदा तालुक्यातील इयत्ता 1 ते 12 च्या सर्व शिक्षकांचे तालुकास्तरीय क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चे आयोजन करण्यात आले होते इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण ग्रामविकास विद्यालय मारोडी येथे तर इयत्ता सहावी ते बारावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अभिनंदन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीरवा येथे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण पार पडले या पहिल्या टप्प्याच्या समारोपीय कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी किरण चीनकुरे यांनी योग्य मार्गदर्शन केले व त्या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी आपल्या शाळेमध्ये करावी अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमात अभिनंदन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरकर व अचल तिजारे उपस्थित होते या प्रशिक्षणात विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवर्ती , संकेत मरसकोल्हे ,केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर, राजू आंबिलकर यांनी अमूल्य मार्गदर्शन केले व सदर व्यवस्थापन मंगला गभने आणि प्रशिक्षक म्हणून महेश गिरी,राजेश चव्हाण ,भाग्यश्री लाडे, अनिल आडे, पी.एन. मेश्राम, सचिन लेंडे, कटरे, नितीन उईके सर, लक्ष्मीकांत बांते म्हणून होते समारोपाचे संचालन श्री अभय बुधे सर यांनी केले सदर प्रशिक्षणात ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0’ हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याचा उद्देश राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आहे. या प्रशिक्षणाद्वारे इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना त्यांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसाचा असून, विविध टप्प्यांमध्ये आयोजित केला जातो. प्रत्येक टप्प्यात, शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवली जातात.
प्रशिक्षणादरम्यान, शिक्षकांना गटकार्य, सादरीकरणे आणि इतर सहभागात्मक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळते. उदाहरणार्थ, विविध प्रशिक्षणार्थींनी गटकार्य सादरीकरणे केली आहेत, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या शिकवण्याच्या अनुभवांचे आदान-प्रदान केले आहे.
या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांचा समन्वय आहे.केलेल्या मार्गदर्शनात अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व मनोगत व्यक्त केले