कामठी-मौदा विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येत्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर 30 ऑगस्ट रोजी कामठी-मौदा विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.या अंतिम मतदार यादीनुसार कामठी विधानसभा मतदार संघात समावेश असणाऱ्या कामठी-मौदा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील एकूण मतदार संख्या ही 4 लक्ष 88 हजार 820 आहे यामध्ये 2 लक्ष 45 हजार 520 पुरुष तर 2 लक्ष 43 हजार 284 स्त्री मतदार व 16 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून हे मतदार एकूण 524 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करून राष्ट्रीय कार्यात मदत करावी तसेच प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करावे व राष्ट्रीय उपक्रमास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कामठी तहसीलदार गणेश जगदाडे यांनी केले आहे.

आगामी निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता त्यानुसार कामठी विधानसभा मतदार संघाची मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे अशी माहिती तहसिलदार गणेश जगदाडे व निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

TERRITORIAL ARMY CYCLE EXPEDITION FLAGGING-OFF CEREMONY 

Sun Sep 1 , 2024
Nagpur :-Territorial Army Cycle expedition team has been flagged off from Kamptee Cantt Nagpur on 01 Sep 24. The team was flagged off by Dr Amit Samarth International Cyclist, he is 19 times Iron man title holder. He has successfully finished Race Across America event. A plantation drive was also carried out before flagging off by  Sachin Naidu renowned Environmentalist […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com