‘धनगर’ आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात – हेमंत पाटील

समाजाचे हक्काचे आरक्षण लवकरच मिळणार

मा.मुंबई उच्च न्यायालयात १६ फेब्रुवारीला सुनावणी

मुंबई :-धनगर समाजाला लवकरच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल,असा दावा इंडिया अगेन्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे.आज, सोमवारी (ता.२३) धनगर आरक्षणासंदर्भात मा.उच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या खंडपीठाने यापूर्वीच धनगर आरक्षणाविरोधात असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाला स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे.आता पुढील महिन्यात १६ फेब्रुवारीला याप्रकरणावर सुनावणी घेण्यात येईल.

केंद्र तसेच राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात न्यायालयात सादर केलेले उत्तर तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि महाराष्ट्र अहिल्याबाई समाज प्रबोधिनी मंच, वनवासी कल्याण आश्रमाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे हेमंत पाटील म्हणाले. आदिवासी समाजावर अन्याय होवू न देता धनगर बांधव त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करीत आहेत.अशात आदिवासी बांधवांकडून कितीही विरोध झाला तरी धनगर बांधवांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.धनगर समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यातील धनगर समाजबांधवांसाठी आतापर्यंत केलेल्या आंदोलनांना यश मिळणार असून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.पाटील यांनी आतापर्यंत आरक्षणासंदर्भात २ हजार पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.लवकरच धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखल मिळणार आहे.समाजाला आरक्षण मिळाले आहे,पंरतु त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने समाजबांधव आरक्षणापासून वंचित असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NCW’s Season Four Coming Soon

Mon Jan 23 , 2023
– Get ready for the mega auctions Nagpur – With the noble aim of nurturing the spirit of healthy competition and an intention to take the sport of cricket to the next level, Nagpur Cricket War’s (NCW) is getting recognition thick and fast. After a huge success of it’s previous three editions, Season Four is just round the corner. With […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!