अरोली :- महाराष्ट्र ग्रामीण संघ तालुका मौद्याची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ शहारे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनात ही कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यात अध्यक्षपदी शैलेश रोशनखेडे यांची तर सचिव अजय मते यांची निवड करण्यात आली.
नव्याने या निवडीत फेरबदल करण्यात आला असून या निवडीत तालुका कार्याध्यक्ष पदी तुषार कुंजेकर. उपाध्यक्षपदी महेंद्र चकोले, प्रेस मीडिया प्रमुख निलेश रावेकर, तालुका प्रमुख पदी विनोद मेश्राम, कोषाध्यक्ष पदी नारायण जर्वेकर, सहकोषाध्यक्ष पदी किशोर मेहर, संघटन प्रमूख बंडू वैरागडे, सदस्य पदी बालू बोरघरे, सदस्य नंदू निंबार्ते यांना तालुका कार्यकारणीत पाठविण्याबाबत बैठकीत एक मत झाले.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकारिता करताना तटस्थता आणि सचोटी कशी असावी यावर प्रकाश टाकला. त्यांनी अनेक किस्से सांगत पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि नैतिकता यावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे मौदा तालुक्यात उत्कृष्ट कार्य करू तसेच तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या परिवारातील सदस्यांच्याही आरोग्य शिबिराचे आयोजन करून हा संघ पत्रकारांच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते. नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यापुढे मौदा तालुक्यातील समस्याना बातमीतून वाचा फोडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.