नागपूर :-कण्वाश्रम, महाल, नागपूर ची आमसभा नुकतीच संपन्न झाली या आमसभेमध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सारंग गडकरी तर सचिवपदी ॲड. रमण सेनाड यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्षपदी वेदमूर्ती विनायक शास्त्री उपाख्य धुंडीपंत पिंपळापुरे, कोषाध्यक्षपदी वैभव तांबोळी तर सहसचिव पदी प्रकाश धामणकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारणी सदस्यांमध्ये वेदमूर्ती अनंतराव धारकर, शेखर चिंचाळकर, पराग मेंढी, डॉ. श्रीकांत पोटे, डॉ. वासुदेवराव भाके, प्रकाशराव उंबरकर, आनंद सालोडकर, मिलिंद देवउपाध्ये, पराग जोशी, छाया उंबरकर, वीणा सदाचार, भाग्यश्री बुरंगे यांची निवड करण्यात आली.
यापूर्वीची कार्यकारणी व ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कण्वाश्रमाच्या स्थापनेच्या मूळ उद्देशांना वर्तमान परिसशीतीला अनुसरून चांगले प्रकल्प राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांनी केला आहे.
कार्यसिद्धी व संकल्पसिद्धी साठी निरनिराळ्या समित्या नेमून सर्व बांधवांसोबत चर्चा करून पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल असेही यावेळी नूतन कार्यरिणीने सांगितले.
मावळत्या कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर पाध्ये, सचिव ॲड. सुनील पोटे, डॉ. वासुदेवराव भाके , सु पा. देव व अन्य मान्यवरांनी नवीन कार्यकारणी चे यावेळी स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.