जिल्हा परिषदेंतर्गत रद्द पदभरतीचे परिक्षा शुल्क परत मिळणार

– उमेदवारांनी माहिती अद्यावत करण्याच्या सूचना

गडचिरोली :- जिल्हा परिषद अंतर्गत मार्च-2019 व ऑगस्ट-2021 मधील गट-क व आरोग्य विभागाच्या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 अन्वये रद्द करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. 5 सप्टेंबर 2023 पासुन सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरावी. त्या अनुषंगाने परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी यापुर्वी माहिती भरलेली आहे. अशा उमेदवारांनी स्वत:चे बँक खाते क्रमांक नमुद करुन माहिती अद्यावत करावी.

उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत न झाल्यास जिल्हा परिषद, जबाबदार राहणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांकडुन प्राप्त कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषद पदभरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोधिमग्गो येथे पाच दिवसीय वेसाक उत्सव

Wed May 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपुर :- हिंगणा तालुक्यातील भीमनगर- ईसासनी परिसरातील बोधिमग्गो महाविहार येथे त्रिविध पावन वैशाख पोर्णीमे निमित्त पाच दिवसीय वेसाक उत्सव आयोजित करण्यात आला असून दिनांक २२मे पासुन २६मे पर्यन्त विविध विषयांवर आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 दिनांक २२ ला सायंकाळी ५ वाजता भदन्त बोधिविनीत परीसर येथे उद्घाटन समारोह भदन्त नाग दिपंकर महास्थविर यांचे हस्ते होणार असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com