भाग्य उजळले बहुजन समाजाचे,बाळासाहेबात पाहतो आम्ही प्रतिबिंब बाबासाहेबांचे…- माजी नगरसेवक दादा कांबळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वंचित बहुजन समाजात आत्मसम्मान निर्माण करण्यासाठी 40 वर्षे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारे, देशाच्या प्रत्येक प्रश्नांची उकल शोधणारे विद्वान व्यक्तिमत्त्व , फक्त बाबासाहेबांच्या रक्ताचेच नाही तर विचारांचे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर संदर्भात भाग्य उजळले बहुजन समाजाचे बाळासाहेबात (आद.ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर)आम्ही प्रतिबिंब पाहतो बाबासाहेबांचे…असे मत माजी नगरसेवक प्रमोद उर्फ दादा कांबळे यांनी कामठी बस स्टँड चौकात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते, तसेच कामठी शहरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्यांची उचल धरत प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारे कामठी नगर विकास कृती समितीचे संयोजक सुगत रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक अविनाश ऊकेश, माजी नगरसेवक विकास रंगारी, माजी ग्रा प सदस्य सुमित, प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट संघटनेचे पदाधिकारी राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, नागसेन सुखदेवें,गीतेश सुखदेवें,दिपंकर गणवीर,अनुभव पाटील, आशिष मेश्राम,सुगत रामटेके,कृष्णा पटेल, शेख सज्जाक ,सलीम भाई, सलमान अब्बास,गंगा वंजारी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर प्रशिक्षण कार्यशाळा

Fri Jul 26 , 2024
– उच्च शिक्षणात परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल यवतमाळ :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अमोलकचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पदवीस्तर अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये शैक्षणिक धोरण प्रभावीपणे लागू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, साधने आणि ज्ञानाने सुसज्ज, सक्षम करणे असा होता. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com