नागपूर :-दिनांक १४/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक पो.स्टे. मौदा येथील अप क्र. ६४१/२३ कलम ३७९ भा.द.वी. के गुन्यात आरोपी शोध कामी फिरत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की लापका रोड येथे राहणारा रज्जत कुवरसिंग ढोलेवार, वय २६ वर्ष, रा. लापका रोड मौदा यांनी त्याचे मित्रासह सदर गुन्हयातील मोटार पंप चोरी केली आहे. अशा खबरेवरून रज्जत ढोलेवार यास ताब्यात घेवुन सदर चोरी बाबत सखोल विचारपूस केली असता सदर गुन्हा मित्र फरार आरोपी नामे- अक्षय सोनटक्के रा. मौदा याचे सोबत केल्याची कबुली दिली आणि मौदा, अरोली, कन्हान, रामटेक येथून ही शेतात लावलेल्या मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले.
उघडकीस आणलेले गुन्हे पोलीस स्टेशन मौदा १) अप.क्र. ६६१ / २३ कलम ३७९ भा.द.वी. २) अप.क्र. ४४६/२३ क. ३७९ भा. द. वी. ३) अप.क्र. ३४९/२३ क. ३७९ भा.द.वी. ४) अप क्र. २५८/२३ क. ३७९ भा.द. वी. ५) अप.क्र. ७३/२३, ३७९ भा.द.वी. पोलीस स्टेशन अरोली ६) अप क्र. १९/२३ कलम ३७९ भाद्र.वी. पोलीस स्टेशन कन्हान ७) अप. क्र. १५६/२३ कलम ३७९ भा.द.वी. पोलीस स्टेशन रामटेक ८) अप.क्र. ४२७/२३ कलम ३७९ भा. द. वी. ९) अप.क्र. १३१ / २३. क. ३७९ भा.द.वी. आरोपीचे ताब्यातून असे विविध गुन्हयातील एकुण ९ मोटर पंप एकुण किंमती ६८००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनील राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, राजू रेवतकर, पोलीस नायक वीरू नरड, संजय वरोदीया, चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.