देशाची कोळसा क्षेत्रातील स्वावलंबनाकडे वाटचाल; एप्रिल-नोव्हेंबर 2023 दरम्यान देशांतर्गत कोळशावर आधारित वीजनिर्मिती 8.38% ने वाढली

– मिश्रणासाठीच्या कोळसा आयातीत 44.28 टक्क्यांनी घट

नवी दिल्ली :- वार्षिक विजेची मागणी सुमारे 4.7% वाढीसह भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जेचा ग्राहक आहे. विशेष म्हणजे, देशात वीज निर्मितीमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.71% लक्षणीय वाढ झाली आहे.

एप्रिल-नोव्हेंबर 2023 या कालावधीत कोळशावर आधारित वीजनिर्मितीत 11.19% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तापमानात झालेली अभूतपूर्व वाढ, देशाच्या उत्तरेकडील भागात विलंबित मान्सून आणि कोविड नंतरच्या काळात संपूर्ण व्यावसायिक कार्यप्रणाली पुन्हा सुरू झाल्यामुळे ही वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2023 पर्यंत देशांतर्गत कोळसा-आधारित वीजनिर्मिती 779.1 अब्ज युनिट्स (BU) वर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत निर्माण झालेल्या 718.83 अब्ज युनिट्स (BU) च्या तुलनेत 8.38% ची वाढ दर्शवते.

मिश्रणासाठीची कोळशाची आयात, विजेची मागणी वाढती असूनही नोव्हेंबर 2023 पर्यंत 44.28% घटून 15.16 मेट्रिक टन (MT) इतकी झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 27.21 मेट्रिक टन (MT) इतकी होती. हे प्रमाण कोळसा उत्पादनात देशाचे स्वावलंबन आणि एकूणच कोळसा आयात कमी करण्यासाठी देशाची वचनबद्धता दर्शवते.

उपलब्धता वाढवणे आणि आयातित कोळशावरचे अवलंबित्व कमी करणे याद्वारे परकीय चलनाची बचत करणे या उद्देशाने सरकार कोळशाचे उत्पादन आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छतावरील सौर ऊर्जा क्षमता उभारणीमध्ये सुमारे 46% इतक्या चक्रवाढ वार्षिक दराने वाढ: केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री

Sun Dec 24 , 2023
नवी दिल्ली :-देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या वाढीचा दर गेल्या 5 वर्षांत जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे, अशी माहिती, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने छतावर 40 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मिती साध्य करण्याच्या उद्देशाने छतावरील सौर ऊर्जा (आरटीएस) निर्मिती कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 08.03.2019 रोजी सुरू केला. केंद्रीय आर्थिक सहाय्य पुरवून निवासी क्षेत्रात छतावर 4,000 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com