संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील आदिनाथ गर्ल्स कॉलेज जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही मात्र या मृत्यू प्रकरणात मृतकाशी घातपात झाला असावा वा मृतकाने आत्महत्या केली असावी असा तर्क लावण्यात येत आहे त्यामुळे या मृत्यू प्रकरणात हत्या की आत्महत्या या प्रकरणाचे गूढ रहस्य अजूनही गुलदसत्यात आहे.
घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शितगृहात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.