शुक्रवारी बाजारच्या सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाची दैनावस्था

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शासनाच्या विविध निधीतून बांधण्यात आलेले कामठी शहरातील बहुतांश सार्वजनिक शौचालय तसेच स्वछतागृहांची दैनास्थिती तसेच स्वच्छतेचा अभाव असून शुक्रवारी बाजार चौकात असलेल्या सुलभ शौचालयाची दुरावस्था असून येथे कोणतीही व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांची कुचंबणा होत असून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे तर काहींना नासीलाजास्तव उघड्यावरच शौचविधी करावी लागत आहे.

शुक्रवारी बाजार चौकात असलेल्या या सार्वजनिक सुलभ शौचालयाचे काही दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून महिला व पुरुषांचे स्वतंत्र शौचालय असूनही अव्यवस्थेमुळे महिला वर्ग येथे शौचास जाणे टाळत आहे.नगरपरिषद मोठमोठ्या गोष्टीचा खोटा देखावा करून पुरस्कार मिळवते आणि याकडे मात्र दुर्लक्ष पुरविते .कामठी शहरातील विविध सार्वजनिक शौचालय व स्वच्छतेगृहाची दयनीय अवस्था असून दारे तुटलेले आहेत, स्वछता पूर्णता ढासळली आहे.शुक्रवारी बाजार चौकातील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या दुरावस्थेमुळे महिला तसेच पुरुष वर्गाची मोठी गैरसोय होत असून येथील अस्वछतेच्या दुर्गंधीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा नगर परिषद प्रशासनाने यावर लक्ष न दिल्यास परिसरात पसरणाऱ्या रोगराईला नाकारता येणार नाही तेव्हा नगर परिषद प्रशासनाने याकडे अक्षम्य लक्ष पुरवून या सुलभ शौचालयाची सुव्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा क्षेत्रातील वृक्ष गणनेला सुरुवात

Mon Apr 24 , 2023
– पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक:  राधाकृष्णन बी यांचे प्रतिपादन नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत मनपा क्षेत्रात असणाऱ्या विविध वृक्षांची गणना केल्या जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात सोमवार (ता. २४) रोजी शहरातील २६२ वर्ष जुन्या पिंपळाच्या वृक्षाचे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी शहरांच्या पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com