उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांचा आयुक्तांनी घेतला आढावा सर्व विभागांशी समन्वय साधून अंमलबजावणीचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता.२८) उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेचा कृती आराखडा नियोजनाबाबत आढावा घेतला.

आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, उष्माघात प्रतिबंधक तज्ज्ञ डॉ.राजश्री कोठाळकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहायक प्रा. डॉ. आशिष निमसरकार, डॉ. लुईस जॉन, डॉ. प्रवीण कुमार, मनपाचे सहायक आयुक्त गणेश राठोड, हरीश राउत, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावा व्हावा, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी याउद्देशाने मनपाद्वारे दरवर्षी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येतात. शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होउ नये यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिले.

यावेळी साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सादरीकरणामार्फत आरोग्य विभागामार्फत दरवर्षी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि सूचना आयुक्तांनी नोंदविल्या. उष्माघाताच्या संदर्भात माहिती, जनजागृती आणि समन्वय योग्यरितेने व्हावे यादृष्टीने आरोग्य विभागासह सर्व विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Thu Mar 2 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ०१) ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानावर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करीत १ किलो प्लास्टिक जप्त केला आहे.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com