– विभागांद्वारे करण्यात येणा-या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेचा कृती आराखडा नियोजनाबाबत आढावा घेतला.
मनपा मुख्यालयात कार्यकारी समितीची बुधवारी (ता.१३) बैठक पार पडली. आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.
उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव व्हावा, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी याउद्देशाने मनपाद्वारे दरवर्षी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येतात. शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होउ नये यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधावा तसेच संबंधित विभागाद्वारे करण्यात येणा-या उपाययोजनात्मक कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठकीत दिले. तसेच त्यांनी पोलिस विभाग, मनपा कर्मचारी, बाजार विभाग तसेच स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधिंना याबाबत चे प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले.
यावेळी साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सादरीकरणामार्फत आरोग्य विभागामार्फत दरवर्षी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि सूचना आयुक्तांनी नोंदविल्या. उष्माघाताच्या संदर्भात माहिती, जनजागृती आणि समन्वय योग्यरितेने व्हावे यादृष्टीने आरोग्य विभागासह सर्व विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
तसेच व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर यांनी नोंदविलेली निरीक्षणे आणि त्यावर सुचविलेल्या उपाययोजनांवर देखील संबंधित विभागांद्वारे प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करणे तसेच स्वयंसेवी संस्थांद्वारे मांडण्यात आलेल्या सुचनांवर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
बैठकीत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, गणेश राठोड, हरीश राउत, नरेंद्र बावनकर, व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर, मनपा उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, पोलिस निरीक्षक विशेष शाखा युनुस मुलानी, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. अभिषेक पांडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. पीयूष खोडे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. सुहास गजभिये, मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. चन्ने, डॉ. शितल वांदिले, डॉ. गजानन पवाने, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. मो.ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. अतिक खान, डॉ. खंडाईत, डॉ. कांचन किंमतकर, डॉ. मेघा जैतवार, इएसआयएस हॉस्पीटलचे डॉ. के. एम. गिरी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अरुषा आनंद, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तांदळे गुरूजी रिसोर्स अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे दिलीप तांदळे, इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिसेसच्या दुर्गा खोब्रागडे, शाहिना शेख, सुरेंद्र मेश्राम, लेडिज क्लबचे पाखी देशमुख, अरोन कोटछेडे आदी उपस्थित होते.