संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बाबा जुमदेवजीच्या 103 व्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत व महाप्रसाद वितरण
कामठी :- सृष्टीचे निर्माते,एका परमेश्वराचा मानवाला परिचय करून देनारे ,अंधश्रद्धा निर्मूलन,वाईट व्यसन, स्त्री भ्रूण हत्या,जातीय भेदभाव नष्ट करणारे,मानव धर्माचे संस्थापक व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक सेवक मांनवसेवा संस्था कामठी व सर्व सेवकांच्या च्या वतीने आज 3 एप्रिल ला मोंढां येथील सेविका बबिता बाई रवी मोहतुरे यांच्या निवासस्थानाहून काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुकीत अनुयायांनी केलेल्या महाणत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम च्या गजराने कामठी शहर दुमदुमले. परमात्मा एक सेवक मंडळ कामठीच्या वतीने नेहरू मंच मोंढा येथे सजविलेल्या रथावर महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या प्रतिमेचे मार्गदर्शक सेविका बबिता रवी मोहतुरे यांचे हस्ते पूजा प्रार्थना करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली .
याप्रसंगी ज्येष्ठ सेविका मार्गदर्शिका मंजुळा अच्छेवार , आसाराम हलमारे, प्रदीप भोकरे, रवी मोहतुरे,आकाश भोकरे,सुरेश तांडेकर,हरीश भोयर, कमल गजबे,मुकेश लोखंडे,देवदास जगनाडे,श्रावण सावरकर, रमेश नखाते ,दामोदर मोहतुरे, दिलीप बाँडेबुचे, काशिनाथ प्रधान,सुधाकर तिरपुडे, सुमित मेरखेड, अक्षय ढोक, राजा मते,अल्केश लांजेवार, विक्की मानकर,आदित्य वरखडे, पिंटू मेरखेड,गज्जू मते,रुपेश गंधाळे आदी सेवक सेविका मोठ्या संख्येत उपस्थित होते.
डीजे, बँड ,फटाक्याच्या आतिषबाजीत निघालेली मिरवणूक नेहरू मंच मोंढा मेन रोड ,हैदरी चौक, मोटर स्टॅन्ड चौक ,जयस्तंभ चौक ,जय भिम चौक ,पारसीपुरा, मरार टोळी, भूषण नगर, पंकज मंगल कार्यालय चौक रनाळा नगर भ्रमण करीत वर्धमान नगर येथील सेवक मंडळाच्या कार्यालयात शोभायात्रेचे समापन करण्यात आले. ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले.
दरम्यान बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त निघालेली शोभायात्रा मोटर स्टँड चौकात पोहोचली असता आकाश प्रदीप भोकरे,आकाश भोकरे ,ऍड निकिता भोकरे यांच्या हस्ते अनुयायांना भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी आकाश भोकरे यांनी बाबा जुमदेवजी यांचे कार्य व व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच गोरगरिबांना व्यसनमुक्तीचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी बाबा जुमदेवजी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा वसा सेवक व सेविकांनी घेऊन व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे मौलिक मत सुद्धा व्यक्त केले .