सैनिक घडविणारे कामठी शहर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहर हे निधड्या छातीचे आणि देशसेवेचे ओतप्रोत असलेले सैनिक घडविणारे भारत देशातील महत्वाचे केंद्र आहे.

मूळ ब्रििटश लष्कराची ओळख असलेल्या भारतीय लष्कराच्या देशभरात जवळपास ४८ छावण्या आहेत. पण, यापैकी कामठी छावणी ही ‘पंचतारांकित’ अर्थात पाच मोठ्या युनिट्सने सज्ज आहे.

येथून प्रशिक्षित झालेले हजारो सैनिक देशाचे रक्षण करीत आहेत.ब्रिटिशांचे शासन येण्यापूर्वी येथे राजे रघुजी (द्वितीय) यांचे राज्य होते.’कर्णिका'(आताची कन्हान नदी)नदीच्या तीरावर राजे रघुजी भोसले कामठेश्वर मंदिरात यज्ञ प्राप्तीसाठी ‘कामाष्टी यज्ञ’करीत होते.या यज्ञानावरुन कामठी हे नाव पडले असे जुने जाणकार सांगतात.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ब्रिटिश सरकारने कर्णिका नदीच्या तिरावरच सन 1821 मध्ये ‘ट्रँजिस्ट कँप’स्थापन केला व त्याअंतर्गत कार्य सुरू ठेवले.ब्रिटिश सरकारने शेजारीच गोराबाजार येथे सैनिकांना राहण्यासाठी निवासस्थान तयार केले त्यामुळे त्या ठिकाणाला गोराबाजार नाव पडले.1826 ला स्थलसेनेच्या मराठा रायफल युनिटची स्थापना झाली .काही अवधीतच या युनिटचे प्रशिक्षणाचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढले.आर्मी प्रशिक्षण केंद्रात कार्यानुसार व्यवसाय सुद्धा सुरू झाले.त्यामुळे अनेक राज्यातून शिंपी, गवळी,सुतार कामठीत आले.सण 1956 ला येथे स्थलसेनेच्या इलेक्ट्रॉनिकल ,मेकॅनिकल, इंजिनियरिंग अकादमीचो सुरुवात झाली.1948 ला आर्मी पोस्टल युनिट चो स्थापना झाली.स्थल सेनेचे येथील पोस्टल युनिट देशातील सर्वात मोठे युनिट आहे.सैन्याच्या पोस्टाचे सर्व पत्रव्यवहार याच युनिटमधून होतात .सन 1960 मध्ये येथेच राष्ट्रीय छात्रसेना (एनसीस) अधिकारी प्रशिक्षण अकादमीची स्थापना झाली.सन 1976 मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.येथे ‘गार्डस रेजिमेंटल सेंटर’ची स्थापना झाली.आता हे स्थल सैन्याची भरती प्रक्रिया ते गार्डस तयार करण्याचे मोठे केंद्र हे कामठी शहरात आहे तसेच आर्मी सप्लाय डेपो हा विभागही येथेच असून विधी अकादमीची सुद्धा स्थापना झाली आहे तसेच स्थल सेनेच्या विधी सेवेचे प्रशिक्षण सुद्धा आता येथे दिले जाते.

ब्रििटश लष्कराने हस्तांतरित केलेल्या व त्यानंतर भारतीय लष्कराने स्वत: उभ्या केलेल्या जवळपास ४८ छावण्या आहेत. या छावण्यांव्यतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे व अकादमी स्वतंत्र आहेत. पण कामठी छावणी परिसरात प्रशिक्षण अकादमी आणि अन्य युनिट्स एकत्र आहेत, हेच याच छावणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य.

आज देशभरातील अधिकारी येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. याच जोडीला लष्कराच्या तिन्ही दलांसह निमलष्करी दल तसेच अन्य देशांमधील अधिकाऱ्यांना लष्करी विधी व कायद्याचे प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था या छावणीय ‘आयएमएल’ नावे आहे. आज या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर पृथ्वीसारख्या क्षेपणास्त्र विभागात रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीदेखील या छावणीत विशेष युनिट तैनात आहे. अत्याधुनिक मिलिटरी इस्पितळदेखील इथे आहे. अशाप्रकारे सर्वच एकाच छताखाली असणारी व देशाच्या केंद्रस्थानी असल्याने सामरीकदृष्ट्या सुर‌क्षित असणारी कामठी छावणी ही वेगळी मानली जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील बहुतेक इमारती फायर ऑडिटविना

Thu Sep 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- व्यवसायिक इमारती, हॉटेल्स आदीं इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी फायर ऑडिट अत्यंत महत्वाचे आहे मात्र कामठी तालुक्यातील बहुतेक इमारतीचे अजूनही फायर ऑडिट झाले नसून संबंधित नगर परिषद प्रशासन चे इमारतीच्याअ फायर ऑडिट कडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तर तालुका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अशा इमारतींना भविष्यातील दुर्घटनेकरिता मोकळे रान झाल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com