संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ईद ए मिलादुन्नबी निमित्त कामठीत भव्य ‘मिरवणूक’
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज 16 सप्टेंबर ला कामठीत भव्य मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर ‘च्या गजराने संपूर्ण कामठी शहर दुमदुमले होते.
मोहम्मद अली मंच रुईगंज कामठी परिसरातून मरकजी सिरतूनब्बी सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहमद हनिफ अशरफी जलाली बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ईद ए मिलादुनब्बीच्या मिरवणुकीला सकाळी 9 वाजता प्रारंभ करण्यात आला होता.याप्रसंगी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत,युसूफ इकबाल कुरेशी,नियाज अहमद कुरेशी, अश्फाक कुरेशी, इर्शाद कुरेशी,इरशाद शेख आदी गनमान्य नागरिक उपस्थित होते.
ही मिरवणूक मो अली गंज क्रीडांगणावरूननिघत शुक्रवारी बाजार, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, पोरवाल चौक, फेरूमल चौक, तंबाकू ओली,गुजरी बाजार,दारोगा मस्जिद रोड,वारीसपुरा गालिब रोड,फुटाना ओली चौक,काल भैरव मंदिर रोड,नया बाजार,पिली हवेली,कोळसा टॉल मस्जिद,भाजी मंडी, कुरेशी नगर, मदन चौक, भोई पुरा रोड,कादर झेंडा, मच्चीपुल,जुनी भाजी मंडी, मुमताज चौक, लाला ओली चौक,हुसैनाबाद,मोटर स्टँड चौक,जयस्तंभ चौक,लकडगंज,भोई लाईन,येरखेडा रोड, आदी मार्गे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत रुईगंज मैदानात मोहमम्द अली जौहर मंच,मोहम्मद अली गंज येथे पोहोचून मिरवणुकीचे समापन करण्यात आले. मोरवणुकीत डिजेवरील धार्मिक गीते,ध्वज फिरवणारे युवक,पारंपरिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव असा मिरवणुकीचा थाट होता.मिरवणुकीत लहानापासून ते मोठ्या वयाच्या समाजबांधवाणी सहभाग दर्शवून नारे तकबिर अल्ला हो अकबरची गर्जना केली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. व प्रसादाचे वितरण करण्यात आले..मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.