पूर्व नागपूरच्या नागरिकांनीही दिली परिवर्तनाची हाक

• जन आशीर्वाद यात्रेत विकास ठाकरेंनी पिंजून काढला पूर्व नागपूर

नागपूर :- देशातील बोकाळलेली महागाई, तरुणांमध्ये वाढलेली बेरोजगारी याला सामान्य माणून कंटाळला आहे. आता नागरिकांना “मन की बात” करणारा नव्हे तर “काम की बात” करणारा नेता हवा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात परिवर्तनाची हाक नागरिकांनी दिली असून विकास ठाकरेंचे जल्लोषात स्वातग पूर्व नागपूरकरांनी केले. शुक्रवारी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेद्वारे पूर्व नागपुरातील नागरिकांशी संवाद साधला.

यात्रेत प्रामुख्याने आमदार अभिजीत वंजारी, धूनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, पुरुषोत्तम हजारे, उमाकांत अग्निहोत्री यांच्या सह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेला जगनाडे चौक येथून सुरुवात झाली.

त्यानंतर नंदनवन पोलीस स्टेशन, संजय नगर, रमना मारुती मार्गे शेषनगर, श्रीकृष्ण नगर, एमआयजी, एलआयजी कॉलनी, कुंभारटोली येथून निघून अभिजीत वंजारी यांच्या कार्यालय आजच्या यात्रेचा समारोप झाला. यावेळी लहान मुलांपासून तरुण वर्ग, महिला ज्येष्ठ नागरिक यांनी विकास ठाकरेंवर पुष्पवर्षाव करत यंदा परिवर्तन घडणारच अशी हाक दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी घेतला भायुमोच्या भ्याड कृत्याचा समाचार

Sat Apr 6 , 2024
नागपूर :- भाजपच्या स्वार्थाच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. इंडिया आघाडीतील उमेदवार विकास ठाकरे यांना शहरात मिळणारा प्रतिसाद बघून भाजपचे नेते चवताळले आहे. मी कालच्या सभेत उपस्थित केलेले महागाई, बेरोजदारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न भाजपला झोंबले आहे. जनतेचा कौल बघून भाजपचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी स्वतः घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी भायुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले. अशा शब्दात माजी केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!